कोल्हापूर

फेट्याची आठवण; दयानंदचे कौतुक

संदीप खांडेकर

कोल्हापूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सोन्या मारुती चौकातल्या दयानंद बाळसिंग हुबाळे याचे दुर्गराज रायगडावर कौतुक झाले अन् शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून आला. दिल्ली येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्याने फेटा बांधल्याची आठवण राष्ट्रपतींनी ताजी केली. शिवाय, त्याच्याबरोबर छायाचित्रही टिपले. राष्ट्रपतींनी भाषणात त्याच्या नावाचा उल्लेख केला. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे २०१८ मध्ये शिवजयंती सोहळा झाला. राष्ट्रपती कोविंद सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचे जोरदार स्वागत केल्यावर दयानंदने त्यांना फेटा बांधला. ही आठवण त्यांच्या स्मरणात पक्की बसली. संभाजीराजे यांच्या विनंतीनुसार त्यांनी नुकतीच रायगडला भेट दिली.

हत्तीखान्यात त्यांना फेटा बांधण्याची जबाबदारी दयानंदकडे होती. त्यांनी तत्काळ दिल्लीत त्याने फेटा बांधल्याची आठवण ताजी केली. त्याचे नाव विचारून छायाचित्रकाराला बोलावले. दोघांचे छायाचित्र टिपण्यास छायाचित्रकाराला सांगितले. राजसदरेवरील भाषणातही त्याच्या नावाचा उल्लेख करीत शिवप्रेमींना चकित केले. दयानंदचे आजोबा धोंडी हुबाळे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सेवेत होते. वडील बाळसिंग हुबाळे फेटा बांधण्यात कुशल होते. तोच वारसा त्याच्याकडे आला आहे. विद्यापीठ हायस्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर फेटा बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ म्हणून हुबाळे कुटुंबीयांची ओळख आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी दिल्लीत राष्ट्रपतींना फेटा बांधण्याची संधी दिली होती. रायगडावर तोच मान पुन्हा दिला. देशाच्या प्रमुखांनी भाषणात नाव घेतल्याचा आनंद जरूर आहे. मात्र, त्याचे श्रेय संभाजीराजे व संयोगिताराजे यांना आहे. हत्तीखान्यात फेटा बांधल्यावर राष्ट्रपतींनी मराठीत फेट्याला काय म्हणतात, अशी विचारणा केली. तसेच, माझे नाव विचारून घेतले. माझ्या नावाचा उल्लेख भाषणात केल्याचा मला आनंद आहे.’’

- दयानंद हुबाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT