There will be many restrictions on the student living with the corona 
कोल्हापूर

जुलै महिन्यापासून शाळा सुरू होणार पण...

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : कोरोनासह जगताना विद्यार्थ्यावर अनेक बंधने येणार आहेत. सोशल डिस्टन्समुळे शालेय जीवनातील सामूहिक प्रार्थना, कवायती, मधल्या सुट्टीत एकत्र बसून सहभोजन, एका बाकावर बसून केलेला खोडकरपणा, शाळेच्या बाहेरील दुकानातील खाद्यपदार्थ खाणे.. हे सर्व काही कोरोनामुळे बदलणार आहे. याच बरोबर विद्यार्थ्यांच्या गणवेशात मास्कचा समावेश होणार तर पालकांच्या मनात भितीची भर पडणार आहे.

राज्य सरकारने जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिलेत, तरी शालेय सत्र चालवणे आव्हानात्मक ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करताना शाळांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या शाळांमध्ये एका वर्गात 40 पासून ते 60 पर्यंत विद्यार्थी असतात. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. हा नियम पाळायचा झाल्यास शाळांना वर्गखोल्यांची संख्या वाढवावी लागेल. याशिवाय शाळा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये भरवावी लागणार आहे. यामुळे शाळेची वेळ कमी करावी लागणार आहे. शाळेतील वर्गाच्या खोल्या व विद्यार्थी संख्या पाहता तीन शिफ्टमध्ये शाळा भरवावी लागेल. त्यामुळे शिक्षकांची संख्या वाढवावी लागेल. प्रत्येक सुट्टीमध्ये किमानएक तासाचे अंतर, शाळांमध्ये स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी अशा नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. 

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून निर्जंतुकीकरणाचे विविध उपाय शाळां करतील ; मात्र शाळेत दररोज विद्यार्थी सगळे नियम पाळतीलच याची काहीही शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेणे शाळांसमोरचे मोठे आव्हान आहे. 

शालेय गणवेश म्हटला की डोळ्यासमोर शर्ट, टाय, पॅन्ट आणि बुट असा पेहराव येतो. या गणवेशात आता मास्कची भर पडणार आहे. 

स्कूल बस, व्हॅन्स, ऑटोरिक्षा यामधून विद्यार्थी शाळेत प्रवास करतात. ऑटोरिक्षा आणि व्हॅनमध्ये तर खचाखच विद्यार्थी भरले जातात. मात्र, करोनासह जगताना हे शक्य नाही आणि कमी विद्यार्थी नेणे हे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे नियम पाळत विद्यार्थ्याना शाळेत पाठवण्याचा खर्च वाढणार आहे.

सरकारी आदेशाचे पालन करून, विद्यार्थ्यांची सुरक्षीततेची काळजी घेऊन शाळा सुरू कराव्यात अशा सुचना शिरोलीतील सर्व शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिल्या आहेत.
-शशिकांत खवरे, सरपंच, शिरोली पुलाची. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT