Thirty First" ceremony to be decorated constructively! 
कोल्हापूर

विधायकतेने सजणार "थर्टी फर्स्ट' सोहळा! 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कोरोनाच्या कटू आठवणींना तिलांजली देत कोल्हापूरकर सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे दिमाखात स्वागत करणार आहेत. गुरुवारी (ता. 31) कोरोनाचे नियम पाळतच हे सर्व उपक्रम होणार असून व्हर्च्युअल कार्यक्रमांचाही समावेश असेल. दरम्यान, थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी विविध हॉटेल, रिसॉर्ट सज्ज झाली असून प्रशासनाच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. 

पोलिसांप्रति कृतज्ञता... 
सावली फाउंडेशनतर्फे पोलिसांप्रति कृतज्ञता म्हणून रात्री बंदोबस्तावरील पोलिसांना कॉफी व बिस्किटांचे वाटप केले जाईल. गुरुवारी (ता. 31) मार्गशीर्ष गुरुवार असल्याने उद्या (बुधवारी) अनेक जण थर्टी फर्स्ट करतील. त्यामुळे सलग दोन दिवस फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबवला जाणार आहे. फाउंडेशनचे कार्यकर्ते पाच जणांच्या स्वतंत्र टीम करून संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवणार आहेत. 

पानपट्टी असोसिएशनतर्फे आरोग्य विमा 
जिल्हा पानपट्टी असोसिएशनतर्फे कोरोना काळात एक लाखाचा निधी शासनाला देण्यात आला. आता नवीन वर्षात सर्व सदस्यांचा आरोग्य विमा उतरवला जाणार असून त्यांच्या कुटुंबीयांसाठीही आरोग्य विमा योजना सुरू केली जाणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना त्याचे नियोजन होणार आहे. 

चाला, आरोग्यासाठी... 
रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती आणि अंबाबाई भक्त मंडळ मोफत अन्नछत्रातर्फे सकाळी सहा वाजता "चाला, आरोग्यासाठी' हा उपक्रम होणार आहे. सकाळी सहा वाजता रंकाळा परिक्रमेला प्रारंभ होणार असून साडेनऊपर्यंत सर्वांनी कमीत कमी एक किंवा पाच प्रदक्षिणा रंकाळ्याभोवती घालणे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. रंकाळ्यासमोरील डी मार्टसमोरून या उपक्रमाला प्रारंभ होणार असून अधिकाधिक कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

निराधारांना स्वेटर... 
सध्याच्या थंडीच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावरच राहणाऱ्या निराधारांना आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांना स्वेटर देऊन नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन विविध संस्थांनी केले आहे. त्याला प्रतिसाद देत विविध ग्रुप आणि संघटनांच्या वतीने या वंचित घटकांना स्वेटर, ब्लॅंकेट आणि उबदार कपडे दिले जाणार आहेत. मात्र, रात्री संचारबंदी असल्याने दहापर्यंतच असे उपक्रम घेण्यावर भर असेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT