Polluted Water in Panchganga River esakal
कोल्हापूर

Panchganga River : पंचगंगा नदीत हजारो मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पंचगंगा नदीत (Panchganga River) प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले.

सकाळ डिजिटल टीम

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न शासन स्तरावरून निकाली काढण्याकरिता लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत, हे उघड आहे.

शिरोळ : येथील पंचगंगा नदीत (Panchganga River) प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले. यामुळे नदीपात्रात मृत माशांचा (Dead Fish) खच पडला आहे. मासे मृत्युमुखी पडल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून, याकडे प्रदूषण महामंडळाने (Pollution Corporation) जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने, जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा विळखा पडला होता. जलपर्णी काढण्याकरिता प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, सोमवारी (ता. १३) व मंगळवारी (१४) पंचगंगा नदीत दुर्गंधीयुक्त व रसायनयुक्त प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे, मंगळवारपासून नदीपात्रातील मासे ऑक्सिजनअभावी गुदमरून मरत असल्याचे मच्छीमारांच्या लक्षात आले.

यामुळे मच्छीमारांनी विनाजाळी मासे पकडण्यास सुरुवात केली. अनेकजण पोती भरून मासे नेत होते. शिवाय अनेक मृत मासे जलपर्णीतून प्रवाहाबरोबर बंधाऱ्याजवळ आले. यामुळे बंधारा परिसरात मृत माशांचा खच पडलेला आहे. दूषित काळे पाणी व मृत माशांमुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. रासायनयुक्त दूषित पाण्याबरोबर अनेक गावांतील सांडपाणी व मैलामिश्रित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. हे पाणी विषारी बनले असून, पिण्यास अयोग्यच बनले आहे. जलचरांबरोबर मानवी आरोग्यासही ते पाणी अयोग्य बनले असताना, प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न शासन स्तरावरून निकाली काढण्याकरिता लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत, हे उघड आहे. प्रत्येक वर्षी लाखो मासे मृत्युमुखी पडून, तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे हे पाणी पिऊन माणसे मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का?

-रामदास गावडे, शिरोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT