three days lock down from Ichalkaranji For emergency services please contact here kolhapur marathi news 
कोल्हापूर

ब्रेकिंग - इचलकरंजी उद्यापासून तीन दिवस 100% लॉक डाऊन ; आपत्कालीन सेवेसाठी येथे करा संपर्क.. 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : इचलकरंजी शहर सोमवार (ता.30) पासून तीन दिवस पूर्ण 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी व मुख्याधिकारी दिपक पाटील यांनी आज पत्रकारांना दिली.

इचलकरंजी शहर हे बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. शहराची लोकसंख्या 3 लाखाहून अधिक असून लगतच्या गावात लोकसंख्या 1 लाखाच्यावर आहे. शहरात 21 दिवसाच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सकाळी 8 ते 11 या वेळेत रस्त्यावर व मार्केट स्थळावर भाजीपाला विक्री तसेच फळ विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र गेल्या चार पाच दिवसात याचा अतिशय वाईट अनुभव प्रशासनाला येत आहे.

नियम धाब्यावर

कोणतेही कारण नसताना नागरिक मोठ्या संख्येने या कालावधीत रस्त्यावर उतरत आहेत. त्याचबरोबर भाजीपाल्याच्या ठिकाणी मोठी गर्दी होताना कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे लक्षात येत आहे.इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असून देशभरातील नागरीक या ठिकाणी आहेत. त्यामुळे शहराला संभाव्य धोका मोठा आहे. प्रशासनाने याबाबत कडक धोरण घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गतच शहर आगामी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येत आहे. दरम्यान शहरातील अनेक खासगी दवाखाने बंद असल्याबाबतची तक्रार प्राप्त होत आहेत. अशा डॉक्टरांच्या विरोधात इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कारवाई करणार आहेत.यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उपमुख्याधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापूरे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा-कोंबडी जगवण्याचे आव्हान ; पोल्ट्री व्यावसायिकांसमोर खाद्याचा प्रश्न गंभीर - ​

 तीन दिवस लॉकडाऊनमध्ये 
* सकाळी 6 ते 9 या कालावधीत फक्त दुध विक्री सुरू राहील.
* भाजीपाला व किराणा दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
* औषध दुकाने व दवाखाने सुरू राहतील.
* शहरात सकाळी दुध वाहतूक वगळता दिवसभर अन्य एकाही वाहनास परवानगी राहणार नाही.
* पालिकेच्या आरोग्य व पाणी पुरवठा सेवा सुरू राहणार

कोरोनाचा सोशल मीडियावर धुमाकूळ ; प्रबोधनासह हास्यकल्लोळ.... - ​
आपत्कालीन सेवेसाठी येथे संपर्क 
इचलकरंजी नगरपालिका आपत्कालीन सेवा कक्ष दूरध्वनी क्रमांक: 0230-2421451,52,53
टोल फ्री क्रमांक: 18002331217

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT