Jatra Sakal
कोल्हापूर

दोन वर्षानंतर यात्रा-जत्रांना उधाण

ग्रामीण अर्थचक्राला गती; हातावरच्या पोटांना रोजगार

डी. आर. पाटील

सरूड - सध्या कोरोनाची धास्ती कमी झाल्याने आणि त्याचबरोबर शासनाने मास्क मुक्तीबरोबरच निर्बंधही शिथिल केल्याने ग्रामीण भागातल्या यात्रा-जत्रांना दोन वर्षानंतर भलताच रंग चढला आहे. ग्रामदैवतांच्या यात्रेच्या निमित्ताने अर्थचक्रालाही गती मिळाल्याने गावोगावी उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनाच्या आगमनानंतर गेल्या दोन वर्षापासून जत्रा-यात्रामध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करून शासनाने सण-समारंभावर निर्बंध लागले होते. ग्रामदैवते आणि कुलदैवते यांची मंदिरे गर्दी आणि तत्सम धोके टाळण्यासाठी बंद होती. साहजिकच सर्वजण कोरोना संसर्गाच्या भीतीखाली वावरत होते. निर्बंध आणि संसर्ग यामुळे दोन वर्षे यात्राच भरल्या नव्हत्या. शिवाय यात्रा जत्रांना नेहमी फिरकणारे पाहुणे सुद्धा कोणत्याही पाहुण्याचा चुकूनही उंबरासुद्धा चढत नव्हते.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबई-पुण्याला असणाऱ्या चाकरमाण्यासह पाहुण्यांचा राबता गावोगावी यात्रा जत्रांच्या निमित्ताने वाढला आहे. यात्रा जत्रेच्या निमित्ताने पै-पाहुणे एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करण्याबरोबरच नात्यांचा जिव्हाळा जपत होते.एवढेच नव्हे तर सलग दोन वर्षे यात्रा बंद झाल्याने फिरत्या व्यावसायिकांचा आर्थिक कणाच मोडला होता.
यामध्ये मिठाईवाले, गुलाल-खोबरे विकणारे, आईस्क्रीमचे गाडे, खेळणी या व्यावसायिकांचा समावेश होता. त्यांचीही गाडी पुन्हा यात्रेच्या निमित्ताने रुळावर येत आहे.

तमाशा आणि कुस्तीचे फड
ग्रामीण भागातल्या यात्रा-जत्रामधून पार पडणारे कुस्त्यांचे फड आणि पारावरच्या लोक कलावंतांचा तमाशा याशिवाय यात्रा पूर्णच होऊ शकत नाही. मात्र दोन वर्षे बंद असलेला तमाशाच्या आणि कुस्तीचा फड आता यानिमित्ताने पुन्हा नव्या उमेदीने उभे राहताना गावोगावी दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT