कोल्हापूर

चार शाळांतील पाचशे विद्यार्थ्यांना सर्पजागृतीचे मार्गदर्शन

CD

01902
वन्यजीव विभागातर्फे चार शाळांत सर्पजागृती
आंबा : वन महोत्सवानिमित्त वन्यजीव आंबा परिक्षेत्राच्या वतीने चार शाळांमधील पाचशे विद्यार्थ्यांना सर्पजागृतीसंदर्भात मार्गदर्शन केले. पश्चिमेकडील आंबा हायस्कूल, चांदोली, परळे निनाई व वाकोली या चार शाळांमधील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी वनप्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना स्लाइड शो दाखविला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे निसर्ग संवादक तज्ज्ञ सचिन धायगुडे यांनी सापांच्या जाती, सापांविषयीचे गैरसमज, खबरदारी, काळजी आणि उपायांबाबत मार्गदर्शन केले. आंबा (गोलीवणे) विभागाचे परिमंडल अधिकारी सागर पोवार यांनी वन्यप्राणी संपदेचे महत्त्व विशद केले. जनतेने परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध शिकार करणाऱ्यांची नावे कळविण्याचे आवाहन पोवार यांनी केले. यावेळी परिमंडल अधिकारी शिवाजी पाटील, वनरक्षक अरविंद पाटील, किरण दळवींसह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT