कोल्हापूर

कॅनॉलमधून वाहत जाणाऱ्या गव्याला तरुणांकडून जीवदान

CD

कॅनॉलमधून वाहत जाणाऱ्या
गव्याला तरुणांकडून जीवदान

उंदरवाडी- सरवडे दरम्यानच्या कॅनॉलमधील घटना

बिद्री ता.२८: पाणी पिण्यासाठी कालव्यात उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गव्याचा तोल गेल्याने तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात होता. या गव्याने कालव्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहते पाणी आणि कालव्याला केलेल्या प्लास्टरमुळे हा गवा दमला होता. वाहत जाणाऱ्या या गव्याला तरुणांनी धाडस दाखवत जीवदान दिले.
याबाबत ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उंदरवाडी गावातील काही शेतकरी उसाला पाणी देण्यासाठी डोंगरभागातील कॅनॉलवरुन चालले होते. बेलजाई मंदिरानजीकच्या कालव्याच्या पाण्यात हा गवा वाहत जात असल्याचे त्यांना दिसले. ही बातमी गावात समजताच सुमारे पन्नासभर युवक कालव्यावर जमा झाले. त्यांनी मोटारसायकलच्या उजेडात या गव्याला पुलानजीकच्या मेहेर या ठिकाणापर्यंत मार्ग दाखविला. कालव्याला केलेल्या प्लास्टरमुळे गव्याचे पाय निसटत असल्याने त्याला वर चढता येत नव्हते. मेहेर भागात कालव्याला प्लास्टर न केलेला भाग असून हा गवा या जागेतून बाहेर पडला आणि थेट डोंगरभागात निघून गेला. गावातील विकास पाटील, प्रवीण कुदळे, संदीप पाटील, दयानंद पाटील, सतीश केनवडेकर, भिकाजी पाटील, अनिकेत पाटील, बाळू कुदळे आदी युवकांनी त्या गव्याला बाहेर पडण्यास मदत केली.
...

आठवड्यातील चौथी घटना

सध्या वाढत्या उष्म्यामुळे तहान भागविण्यासाठी आणि डोंगरभागात हिरवा चारा नसल्याने हे गवे कॅनॉल परिसरात येतात. सरवडे हद्दीतील बादा या ठिकाणी गवे पाण्यात पडल्याच्या घटना वारंवार घडतात. तेथून त्यांना उंदरवाडीतील मेहेर ठिकाणापर्यंत सुमारे दोन किमीचे अंतर पोहत जावे लागते. या दोन्ही ठिकाणांच्या दरम्यान गवा पाण्यात पडण्याची गेल्या आठवड्यातील ही चौथी घटना आहे. गव्यांच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण असून वन विभागाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT