कोल्हापूर

कृषिपंपांचे वेळापत्रक शेतकऱ्यांना त्रासदायक

CD

कृषिपंपांचे संग्रहित छायाचित्र वापरावे
.....
कृषिपंपांचे वेळापत्रक शेतकऱ्यांना त्रासदायक

महावितरणने दिवसा दहा तास वीजपुरवठा करण्याची मागणी

दत्तात्रय वारके, सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. ३ : कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात असताना महावितरणने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. महावितरणने एक मार्चपासून वीजपुरवठ्याच्या बदललेल्या वेळा जाहीर केल्या असून, त्या शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. हे वेळापत्रक बदलण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
कृषिपंपांना दिवसा दहा तास वीजपुरवठा करण्याची मागणी गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांमधून होत आहे. यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस पाणी देण्यासाठी जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरीवर्गाने पुन्हा पुन्हा केली आहे.
पहाटे ४ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत वीजपुरवठा करण्याची मागणी एकीकडे होत असताना महावितरणने मार्च महिन्याचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये रात्री ९ ते पहाटे ५ आणि सकाळी ८ ते दुपारी ४ अशी वेळ दिली आहे; परंतु या वेळेचा विचार करता शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र पाण्यासाठी जागून काढावी लागणार आहे. शिवारात आधीच गवे, बिबटे, हत्ती, अस्वल, कोल्हा, साप यांचा वावर असताना शेतकऱ्यांना रात्रभर पाणी देण्यासाठी शेतातच थांबावे लागणार आहे, तर दुसरीकडे दिवस पाळीत दुपारी चारपर्यंत उन्हाच्या झळा सहन करत शेतकऱ्यांना पाणी द्यावे लागणार आहे.
मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारी चार म्हणजे शेतकऱ्यांना भर उन्हात थांबावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महावितरणने जाहीर केलेले मार्चचे वेळापत्रक अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे हे वेळापत्रक बदलून पहाटे ४ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
....
चौकट....
फेब्रुवारीतच उष्माघाताच्या घटना
चालू वर्षी फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे दुपारी बारानंतर बाहेर पडणेही जिकिरीचे असताना शेतकरी मात्र या कडाक्याच्या उन्हात पिकांना पाणी देताना दिसतो आहे. गेल्या चार दिवसांत कागल तालुक्याच्या पश्चिमेकडील एका गावात उसाला पाणी देण्यास गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील उर्वरित महिन्यांत शिवारात काम कसे करायचे, असा सवाल शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पावसाचा जोर पुन्हा वाढणार! महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता

MPSC Paper Leak News: औषध निरीक्षक भरती परीक्षेवर पेपरफुटीचा आरोप, एमपीएससीचा इन्कार; अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Latest Marathi News Live Update: दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Marathi Children’s Play: हैदराबादमध्ये मराठीचा डंका: ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ बालनाट्याने आंतरराष्ट्रीय रंगमंचावर जिंकली मने

Free Education: जगातील 'या' देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत...सरकारच उचलते सर्व खर्च!

SCROLL FOR NEXT