कोल्हापूर

बांबवडे

CD

दीड हजारांवर शेतकरी वंचितर
‘शाहूवाडी’तील पीएम किसान योजनेतील चित्र; कृषी खात्याची मोहीम

अमर पाटील ः सकाळ वृत्तसेवा

बांबवडे, ता. ११ ः शाहूवाडी तालुक्यातील १ हजार ८०१ शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत. त्यांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून कृषी विभागाची गावागावांत मदतकार्य सुरू आहे. १५ जूनपर्यंत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना किसान योजनेचे १९ हप्ते मिळाले आहेत. २० तारखेनंतर २० वा हप्ता जमा होणार असून त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा लाभ व्हावा यासाठी कृषी विभाग प्रत्येक गावात याद्या जाहीर करून व दवंडी देऊन कॅम्प घेऊन हे वंचित शेतकरी योजनेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
शाहूवाडी तालुक्यातील ३२ हजार ४५२ शेतकऱ्यांना ६ कोटी ९० लाख ४ हजार रुपये निधी पी. एम. किसान योजनेसाठी मंजूर आहे. २० व्या हप्त्यासाठी नवीन ६ शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली आहे.

"जे शेतकरी काही आयकर विवरण भरत आहेत. त्यांचे उत्पन्न करपात्र नसताना त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. उत्पन्न मर्यादेसह जाचक अटी शासनाने शिथिल कराव्यात. गरीब शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा.
- नंदकुमार जामदार, शाहूवाडी तालुकाध्यक्ष अ. भा. ग्राहक पंचायत

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता माहे जून २०२५ मध्ये वितरित होणार असल्याने ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक आधार सीडिंग, भूमी अभिलेख नोंदी अद्यावतीकरण करणे बाकी आहे; त्या लाभार्थ्यांनी या बाबींच्या पूर्ततेसाठी नजीकच्या महा-ई-सेवा केंद्र, बँक, तहसीलदार कार्यालय व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
- नीलम चाकणे, शाहूवाडी तालुका कृषी अधिकारी.

दृष्टिक्षेपात
वंचित असलेले शेतकरी व त्याची कारणे

अपूर्ण केवायसी असलेले*५३९
आधार व बँक सेडिंग*१०७५
जमीन सेडिंग*१८७
पती-पत्नी लाभ घेतलेले*३३९
त्यापैकी पात्र शेतकरी*१६९
कारवाई झालेले*१३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT