कोल्हापूर

शाश्वत विकासाद्वारे ग्रामविकासाला चालना मिळेल

CD

02524
चंदगड ः शाश्वत विकास योजना कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना शिवाजी गुरव.
------------------------------------
शाश्वत विकासाद्वारे ग्रामविकासाला चालना मिळेल
शिवाजी गुरव; चंदगडला बारा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १७ ः केंद्र शासनाने शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण अंतर्गत २०३० पर्यंत देशातील ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर करार केला आहे. त्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना मिळेल, असे मत शिवाजी गुरव यांनी व्यक्त केले. येथे पंचायत समितीच्या सभागृहात २ ते १४ मार्चअखेर प्रशिक्षण झाले. त्याच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.
शासनाने गावच्या विकासासाठी प्रत्येक घटकावर आधारित प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. त्यामध्ये गरिबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जमसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधा असलेले गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, लिंग समभाव पोषक गाव आदी विषयांचा समावेश आहे. दरवर्षी या प्रत्येक घटकावर आधारित काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. माधुरी भोसले, काशिनाथ मोरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनीही या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या दीपाली चव्हाण, सय्यद यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT