कोल्हापूर

सोलर पंप बसवण्यात विलंब

CD

chd41.jpg

05311

चंदगडला कृषी सोलर पंप बसवण्यात विलंब
शेतकऱ्यांत नाराजी ; बळीराजा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

चंदगड, ता. ४ : तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप योजनेचा लाभ मिळण्यात मोठा विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी कोल्हापूर येथे महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे , ‘‘शासनाच्या महत्त्वाकांक्षी “कृषी सौर पंप” योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले असून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, काम पूर्ण होऊनही प्रत्यक्षात सोलर पंप बसवण्यात मोठा विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या लागवड व सिंचनासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोलर पंपासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले असून काहींनी तर आवश्यक रक्कमही भरलेली आहे. तरीही तीन महिन्यांपासून साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण देत काम रखडले आहे. परिणामी, शेतकऱ्यांची पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून पिकांना पाण्याची गरज आहे. सोलर पंप बसवले न गेल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रलंबित सोलर पंपांचे काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT