हातकणंगले तहसीलदारांच्या
नोटीसला केराची टोपली
अतिक्रमणधारकांकडून अतिक्रमणे काढून घेण्याकडे दुर्लक्ष
हातकणंगले,ता. ५ ः तहसील कार्यालयासमोरील ३० अतिक्रमणधारकांना हातकणंगले तहसीलदारांनी २७ मार्च रोजी अतिक्रमण काढून घेण्याची नोटिसा बजावल्या, अतिक्रमण वेळेत काढून घेतले नाही तर २४ तासांत अतिक्रमण हटविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या; मात्र अतिक्रमणधारकांनी या नोटिसीला केराची टोपली दाखवली आहे.
नोटिसा लागू केल्यानंतर काही काळ अतिक्रमणधारकांची तारांबळ उडाली होती. २४ तासांनंतरही कोणतीच हालचाल न झाल्याने पुन्हा अतिक्रमणधारकांनी दुकानाबाहेर लावलेल्या नोटिसांकड दुर्लक्ष करत दुकान, हॉटेल, टपऱ्या थाटल्या. तहसील कार्यालयासमोरील मोकळ्या जागेवर २८ लाखांचा विकासनिधी मंजूर झाल्यानंतर संबंधित प्रशासनाने ही जागा अतिक्रमणमुक्त करून विकासकामे पूर्ण करण्याबाबतचे आदेश असताना संबंधित प्रशासनाने अतिक्रमण न काढता विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे.
चौकट...
अतिक्रमण करा आणि भाड्याने द्या ...
हातकणंगले तहसील कार्यालयासमोरील काही दुकानदारांनी अतिक्रमण करून ती दुकाने चहा, झेरॉक्स सेंटर, टायपिस्ट यांना भाड्याने दिली आहेत. त्यामुळे ‘अतिक्रमण करा व भाड्याने द्या’ हा नवीन फंडा हातकणंगले तहसील कार्यालयसमोर सर्रास सुरू आहे. आता मारुती मंदिराच्या बाजूला ही अतिक्रमण जोरात सुरू आहेत.
--
कोट
अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा जरी २७ मार्चला दिल्या असल्या तरीही त्यानंतर आलेल्या सुट्या; तसेच मार्चअखेर मुळे यात दिरंगाई झाली असेल. सर्वच अतिक्रमणांवर हातोडा उगारून सर्व जागा तत्काळ अतिक्रमणमुक्त केली जाईल.
- सुशील बेल्हेकर, तहसीलदार, हातकणंगले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.