कोल्हापूर

हुपरी व्हॉट्स ॲपवर स्टेटसला आक्षेपार्ह फोटो प्रकरणी परिसरात बंद; दोघांना अटक

CD

02328

हुपरी: आंदोलकांना शांततेचे आवाहन करताना अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील. शेजारी मुरलीधर जाधव, दिनकरराव ससे, अजित सुतार, राजेंद्र पाटील आदी.
...

हुपरीत दुसऱ्या दिवशीही बंद

आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणः रेंदाळमधील दोघा संशयितांना अटक

हुपरी, ता.६: व्हॉट्सॲपवर स्टेटसला आक्षेपार्ह फोटो ठेवल्याचे पडसाद शहर व परिसरात आज दुसऱ्या दिवशीही उमटले. संशयितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी शहरात बंद पाळण्यात आला. दरम्यान, हुपरीबरोबरच रेंदाळ, यळगुड, तळंदगे येथेही आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शुक्रवारी (ता.५) रात्री उशिरा रेंदाळ येथे सोशल मीडियवर वारंवार वादग्रस्त संदेश पाठवत असल्याच्या कारणावरून एकाच्या घरावर झालेली दगडफेकीची घटना वगळता परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

दरम्यान, येथील एक अल्पवयीन तसेच रेंदाळमधील दोघे अशा तिघांवर समाजात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पैकी रेंदाळमधील दोघा संशयितांना पोलीसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (ता.५) सायंकाळी येथील एका अल्पवयीन मुलाने व्हॉट्सॲपवर स्टेटसला आक्षेपार्ह फोटो ठेवल्याचे आढळून आल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ‘त्या’ अल्पवयीन मुलावर अद्यापही कारवाई झाली नसल्याचे समजताच संतप्त तरूण सकाळी मोठ्या संख्येने गोळा झाले. जमावाने पोलिस ठाण्यासमोर येऊन रास्ता रोको केला. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, माजी सरपंच दिनकरराव ससे, माजी उपसरपंच अजित सुतार, राजेंद्र पाटील, रविंद्र चिटणीस, नितीन गायकवाड, रेंदाळचे महेश कोरवी आदींनी संशयितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख, उपनिरीक्षक गणेश खराडे आदींनी रेंदाळ येथील तरुणांवर अटकेची कारवाई केल्याची तसेच बाहेरगावी असलेल्या हुपरी येथील अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती देत शांतता राखण्याचे आवाहन केले.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT