हुपरी परिसरात डेंगीसदृश रुग्ण
हुपरी, ता.२८: शहर परिसरात डेंगी तसेच इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला असून उपचारासाठी खासगी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने वेळीच सतर्क होण्याची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांत वातावरणात मोठा बदल झालेला आहे. शहरात दूधगंगा नदीतून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा देखील अशुद्ध होत आहे. सार्वजनिक स्वच्छता तसेच गटारींची साफसफाई, कचरा उठावाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. परिणामी शहरात ठिकठिकाणी डेंगी, हिवताप आदी साथीच्या आजाराचा फैलाव होत चालला आहे. सौम्य स्वरूपाच्या तापा बरोबरच थंडी वाजणे, डोळे, डोके, अंगदुखी, उलटी, भूक मंदावणे, मळमळणे आदी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत असून दवाखान्यांतील गर्दी वाढत आहे. माळभागातील शाहू नगर परिसरातील एकाच कुटुंबातील दोन वर्षाच्या बालकासह तिघांना डेंगीसदृश आजाराची लागण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.