कोल्हापूर

ऋषिकेशानंद बाबा महाराज ‘पिठाभिषेक’

CD

ऋषिकेशानंद बाबा महाराज ‘पिठाभिषेक’
इचलकरंजी ः सद्‍गुरू बाबा महाराज यांचे अविमुक्त सुक्षेत्र दत्तवाड येथे ऋषिकेशानंद बाबा महाराज यांचा ‘पिठाभिषेक’ २५ व २६ तारखेला होणार आहे. यानिमित्त ध्वजवंदन, सिद्धेश्वर स्वामी फोटो पूजन, होम विधी, कलश मिरवणूक, प्रसाद, अमृत उपदेश, पट्टाभिषेक विधी विधान व होम प्रवचन, महाप्रसाद होणार आहे. काडसिद्धेश्वर स्वामी (कणेरीमठ) व डॉ. पालाक्ष शिवयोगेश्वर महाराज काद्रोळी, भवानीसिंग घोरपडे, संताजीराव घोरपडे आदी उपस्थित राहणार आहेत.
-----------------------

शाहू हायस्कूलच्या मुलांची निवड
इचलकरंजी ः जळगाव येथे होणाऱ्या शालेय शासकीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात शाहू हायस्कूलच्या मुलांची निवड झाली आहे. स्पर्धा २३ ते २५ जानेवारीला होणार आहे. निवड झालेले खेळाडू कर्णधार- विश्वजित सुपेकर, यशराज आडके, हर्षवर्धन पाटील, समीद मुल्ला, शहानवाज खतीब, विराज थोरवत, विनायक बेळगी, यश गावडे, केदार पाटील, आदित्य आधटराव, आकाश व्हन्नूर, अथर्वराज गावडे. खेळाडूंना महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, क्रीडा अधिकारी शंकर पोवार, संजय कांबळे, संजय शेटे, सचिन खोंद्रे, आकाश माने, पी. ए. पाटील, तुषार जगताप, नंदकुमार भोरे शुभेच्छा दिल्या.

---------------------------------

साई इंग्शिल स्कूलचे यश
इचलकरंजी ः महाराष्ट्र राज्य कला संचनालयामार्फत घेतलेल्या शासकीय रेखाकला स्पर्धेत साई इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. रेखाकला इलेमेंटरी व इंटरमेजिएट परीक्षेत अनुज सिंदगी, श्रद्धा केसरवाणी, तनिष्क वासुदेव, हरीप्रिया झंवर, सर्वेश देवरमणी, पियुष गुप्ता, रितेश सावंत, प्रिया वैष्णव यांनी यश मिळवले. विद्यार्थ्यांना अरुणा म्हेत्रे यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार मुख्याध्यापक आर. एन. आळतेकर व मिलिंद कांबळे यांच्याहस्ते केला.
-----------------------------
बालाजी विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन
इचलकरंजी ः बालाजी विद्यामंदिर प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन, कोळी, पंजाबी, मिळ पाश्चिमात्य अशा विविधांगी वेशभूषेसह विद्यार्थ्यांनी नृत्ये सादर केली. गणेशवंदना या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर कोळीगीत, जय श्रीराम, जंगल गीत, शिवगीत. गोंधळ गीत, डिस्को साँग, स्टॅच्यू साँग, पंजाबी गीत, देशभक्तिपर गीत अशा विविध नृत्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. माई बाल विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका शैला कांबरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे, मुख्याध्यापिका निशा सूर्यवंशी, संगीता गोड आदी उपस्थित होते.
-----------------------

‘बालाजी’मध्ये चलनाचे प्रदर्शन

इचलकरंजी : बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विबासा इंटरनॅशनल प्रायव्हेट या कंपनीचे संचालक विशाल मलमे व रक्षंदा साखला यांनी विविध ३० देशातील करन्सी, चलनी नोटा व त्या देशाबद्दची सविस्तर माहिती प्रदर्शनात मांडणी होती. त्यासोबत भारतीय रुपयांची तुलना, देशाची लोकसंख्या या संदर्भात माहिती दिली. विद्यार्थी ज्ञानसंपन्न व्हावेत या उद्देशाने मुख्याध्यापिका एम. एस. रावळ यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर, एस. जी. जाधव, ए. एस. टेकाळे आदी उपस्थित होते.
-----------------------------

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
इचलकरंजी ः पोदार इंटरनॅशनल प्रशालेच्या स्नेहसंमेलनामध्ये वार्षिक अहवाल सादर करून पाहुण्याच्याहस्ते गुणवंत आणि यशस्वी विद्यर्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार केला. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी ‘नवरस’ या विषयावर नाटिका तसेच नवरस संबंधित गाण्यांवर लय आणि तालबद्ध नृत्याविष्कार सादर केले. खासदार श्री. धैर्यशील माने उपस्थित होते. प्राचार्य ईश्वर पाटील, विनय महाजन, कर्नल एस. पी. कुलकर्णी, नितीन अग्रवाल आदी उपस्थित होते. आभार अमिता पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT