कोल्हापूर

आजपासून मॅटवरील कबड्डी स्पर्धा

CD

01558
इचलकरंजी: येथे होणा-या कबड्डी स्पर्धेच्या तयारीची शनिवारी पाहणी करण्यात आली.

इचलकरंजीत आजपासून कबड्डी स्पर्धा
इचलकरंजी : देशभक्त बाबासाहेब खंजीरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयहिंद मंडळच्यावतीने मॅटवरील कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याची आज संयोजकांनी पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. कोल्हापूर व सांगली जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा या 70 किलो वजनी गटातील असून स्पर्धेमध्य 18 नामवंत संघाना निमंत्रित करण्यात आले आहेत. 14 ते 16 मे रोजी प्रकाशझोतामध्ये सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत या स्पर्धा जयहिंद मंडळाच्या क्रीडांगणावर होणार आहेत.
स्पर्धेचे उद्‍घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार राजीव आवळे, रणजीत कदम, प्रा. संभाजीराव पाटील, बाळासाहेब कलागते, राजगोंडा पाटील, अशोक जैन, संदीप कल्याणकर, गंगाराम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकाळी ५ वाजता होणार आहे. क्रीडा शौकिनांना या सामन्यांचा आनंद घेता यावा, यासाठी क्रीडाप्रेमींसाठी ४ हजार क्षमतेची प्रेक्षा गॅलरी, उत्तम लाईट व्यवस्था व इलेक्ट्रिक स्कोर बोर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तरी सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जन्मशताब्दी समितीचे कार्यवाह शामराव कुलकर्णी व जयहिंद मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळ्या यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT