कोल्हापूर

श्रमसंस्कार शिबिरातून समाजसेवेचा संस्कार

CD

05756
मौजे चंदूर : श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभप्रसंगी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
-------------
श्रमसंस्कार शिबिरातून समाजसेवेचा संस्कार
वैशाली आवडे; कन्या महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

इचलकरंजी, ता.५ : राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरासारख्या उपक्रमांमधून समाजसेवेचा संस्कार होत असतो. हा संस्कार आयुष्यभराची शिदोरी म्हणून स्वयंसेविकांना उपयोगी ठरतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा.सौ. वैशाली आवाडे यांनी केले.
येथील श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे चंदूर (ता. हातकणंगले) येथे झाले. शिबिराच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगलेचे मराठी विभागप्रमुख डॉ. अमर कांबळे होते. डॉ. कांबळे म्हणाले, ‘आपला जन्म कोठे होणार हे आपल्या हाती नसले तरी आपल्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करून आपण समाजात आपला ठसा उमटवू शकतो. त्यासाठी एनएसएससारख्या श्रमसंस्कार शिबिरांचा आपल्या विकासासाठी वापर स्वयंसेविकांनी करून घ्यावा.’ एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज शिंदे यांनी शिबिरात राबवलेल्या विविध उपक्रमांचा विस्तृत अहवालाचे वाचन केले. त्यानंतर स्वयंसेविका राणी हालगेकर, पल्लवी साळुंखे, तेजश्री शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
एनएसएस विभागाच्या सदस्य प्रा. संगीता पाटील यांनी प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्राचार्या प्रो.( डॉ) त्रिशला कदम यांनी स्वागताध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त केले. आभार प्रा वर्षा पोतदार यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी केले. प्रा. सोमनाथ गायकवाड, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, उपसरपंच संजय जिंदे, वसंत सनदी, ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT