कोल्हापूर

आत्महत्या, गर्दी

CD

06049

इचलकरंजी : पंचगंगा नदीतील जलपर्णी हटविल्यानंतर महिलेचा मृतदेह मिळून आला.यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
...

इचलकरंजीमध्ये पंचगंगेत
विवाहितेची आत्महत्या

इचलकरंजी, ता.१० : जलपर्णीने व्यापलेल्या पंचगंगा नदीत आज भर दुपारी एका विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या केली. अंजुम मौला मुजावर (वय ४५, रा. इचलकरंजी) असे तिचे नाव आहे. सुमारे दोन तास नदीतील जलपर्णी हटवल्यावर या महिलेचा मृतदेह मिळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी, गावभाग परिसरात राहणाऱ्या‍ अंजुम मुजावर या परगावी गेल्या होत्या. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्या परगावाहून घरी परतल्या. पाणी पिऊन थेट त्या पंचगंगा नदीच्या दिशेने चालत गेल्या आणि लहान पुलावरून नदीत उडी घेतली. याबाबतची माहिती समजताच गावभागचे पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार, शिवाजीनगरचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलिस पथक आणि आपत्कालीन मदत विभागाच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. मुजावर यांच्या नातेवाईकांनी पुलावर धाव घेतली असता चप्पल आणि नागरिकांनी केलेल्या वर्णनानवरून नदीत उडी घेतलेली महिला अंजुम मुजावर असल्याचे स्पष्ट झाले. नदीत शोध मोहिम सुरु झाली. नदीत मोठ्याप्रमाणात जलपर्णी वाढल्याने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने जलपर्णी हटवण्यात आली. अखेर दोन तासांनी मुजावर यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबतची फिर्याद गौस गुलाब मुजावर (वय ५७) यांनी पोलिसांत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT