कोल्हापूर

खुनी हल्ला

CD

मित्रानेच मित्रावर केला खूनी हल्ला
उसने घेतलेले पैसे परत न दिल्याचा राग; गुन्हा दाखल

इचलकरंजी, ता.४ : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एका यंत्रमाग कामगार मित्रानेच आपल्या यंत्रमाग कामगार मित्रावर खूनी हल्ला केला. चाकूने पाठीवर व कपाळावर सपासप वार करून धीरज लालबिहारी राम याला गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी सौ. गुडियादेवी धीरज राम यांच्या फिर्यादीनुसार अमन बाणदार (रा.खोतवाडी) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसातून मिळालेले माहिती अशी, सौ. गुडियादेवी राम यांचे पती धीरज व संशयित अमन हे दोघे मित्र आहेत. दोघेही खोतवाडी(ता. हातकणंगले) येथील महादेव देसाई यांच्या मालकीच्या यंत्रमाग कारखान्यात काम करतात. धीरज यांनी अमन यांच्याकडून घर खर्चासाठी म्हणून दहा हजार रुपये हात उसने घेतले होते. त्यापैकी काही पैसे धीरज यांनी परत दिले होते. उरलेल्या पैशासाठी अमन याने धीरज याच्याकडे तगादा लावला होता.धीरज यांनी उरलेले पैसे काही दिवसांनी देतो असे सांगितले. मात्र, याचा राग अमन यांना होता. दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास यड्राव ( ता. शिरोळ ) येथील पार्वती गेट समोर दोघे भेटले आणि दोघांमध्ये वाद जुंपला.
धीरज याला उरलेले पैसे दे नाहीतर तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. अमन याने हातातील चाकूने पाठीत व कपाळावर जबर वार करून धीरज याला गंभीर जखमी केले. हल्ला करून अमन पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत धीरज रस्त्याच्या बाजूला पडला. त्याला उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर बनल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचार करता सांगली सिव्हील रुग्णालयात हलवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT