कोल्हापूर

वाहतूक कारवाई

CD

06246
इचलकरंजी : विना नंबरप्लेट फिरणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई झाली.
...

इचलकरंजीत १०० विना नंबरप्लेट वाहनांवर कारवाई

इचलकरंजी, ता.५ : शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरी रोखण्यासाठी तसेच चेन स्नॅचिंगला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कारवाईची धडक मोहीम राबवली. विना नंबरप्लेट फिरणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून चाप बसवला. आज दिवसभरात जवळपास विना नंबरप्लेट फिरणाऱ्या सुमारे १०० वाहनांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात विना नंबरप्लेट वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढत आहे. तसेच दुसरीकडे वाढत्या मोटारसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंग गुन्ह्यामध्ये विनानंबर प्लेट वाहनांचा वापर सर्रास होत आहे. यासह वाहतूक नियम भंग केल्यानंतर दंड चुकवण्यासाठी अनेक वाहनचालक विना नंबर प्लेट वाहन चालवत असतात अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज दिवसभरात विना नंबरप्लेट फिरणाऱ्या सुमारे १०० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याप्रकारची कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक शाखेस सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसुळे यांनी केले आहे. पथकात पोलिस उपनिरीक्षक किरण कांबळे, हवालदार गुरुनाथ चव्हाण, प्रदीप कोळी ,प्रमोद आंबी, सुरेश कांबळे , विश्वनाथ बागडे यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT