कोल्हापूर

खुनी हल्ला मयत

CD

यड्राव येथील खुनी हल्ल्यातील
जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

इचलकरंजी, ता.६ : यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर झालेल्या खुनी हल्ल्यातील जखमीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. धीरज लालबिहारी राम असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या गुन्ह्यातील हल्लेखोर अमन बाणदार याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून याबाबतचा अहवाल न्यायालयास पाठवणार येणार असल्याची माहिती शहापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, खोतवाडीतील यंत्रमाग कारखान्यात धीरज राम आणि अमन बाणदार हे दोघे काम करत होते. घर खर्चासाठी धीरज यांनी अमनकडून उसने १० हजार रुपये घेतले आणि त्यापैकी काही रक्कम परतही केली होती. उर्वरीत रक्कमेसाठी अमन आणि धीरज यांच्यात वाद झाला होता. या वादातून अमन याने धीरजच्या पाठीत, कपाळावर चाकूने जबरी वार केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरजवर सांगली सिव्हील रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी बाणदार याला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT