कोल्हापूर

पत्रकारितेमध्ये उत्तम संधी

CD

पत्रकारितेमध्ये उत्तम संधी
राहुल खंजिरे; बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दीनिमित्त कार्यशाळा
इचलकरंजी,ता.८ : पत्रकारांना २४ तास मेहनत करावी लागते. बातमी तयार करण्यापासून ती प्रसिद्ध करण्यापर्यंतचा कालावधी खूप महत्वाचा असतो. बातमी ही समाजभान राखणारी, सकारात्मक पत्रकारिता निर्माण करणारी लागते. सध्या उत्तम जाणकार पत्रकारांची उणीव जाणवते. पत्रकारितेमध्ये उत्तम संधी उपलब्ध आहेत, तिथपर्यंत पोहचा असे प्रतिपादन दि इचलकरंजी इंडस्ट्रीयलचे चेअरमन व माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांनी व्यक्त केले.
देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र, नाईट कॉलेजमधील बी. ए. जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रमाच्या मुक्तसंवाद अंक प्रकाशन सोहळा आणि लोकशाहीतील पत्रकारांची भूमिका व हक्क" या एकदिवसीय कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मान्यवरांच्या उपस्थितीत बी.ए. जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या मुक्तसंवाद या अंकाचे प्रकाशन केले.
कार्यशाळेसाठी हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते. त्यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान केला. प्रास्ताविक केंद्रसंयोजक प्रा. डॉ. आर. व्ही. सपकाळ यांनी केले. स्वागत अंजुम शेख, प्रमुख पाहुण्यांची ओळख नजीर मुल्ला तर सूत्रसंचालन नंदकुमार बांगड यांनी केले. आभार अमोल चोथे यांनी मानले. केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. पुरंधर डी. नारे, प्रा. डॉ. देवेंद्र बिरनाळे, राजेंद्र मुठाणे, प्रा. एफ. एन. पटेल आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT