कोल्हापूर

निसर्ग नष्ट करून विकास घातक

CD

06326
इचलकरंजी : मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत बुधवारी चौथ्या दिवशी अतुल देऊळगावकर यांचे निसर्गकल्लोळ या विषयावर व्याख्यान झाले.

लोगो ः मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला

निसर्ग नष्ट करून विकास घातक
अतुल देउळगावकर; ‘निसर्गकल्लोळ’ विषयावर व्याख्यान
इचलकरंजी, ता. १८ : निसर्ग नष्ट करून विकास केला तर तो सर्वांसाठी घातक ठरणारा आहे. आपण निसर्गाची जपणूक करणारी जीवनशैली ठेवायला हवी. यासाठी पर्यावरणीय मानव्यशास्त्राचा जगभर केला जाणारा अभ्यास आपणही करायला हवा. पर्यावरणीय बुद्धिमत्ता, वस्तूंचे उत्पादन आणि वाहतूक यामुळे होणारे कार्बन उत्सर्जन तसेच सामाजिक व भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होण्याची आवश्यकता या सर्वांचा विचार निसर्ग रक्षणासाठी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी केले.
येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत चौथ्या दिवशी ‘निसर्गकल्लोळ’ या विषयावर ते बोलत होते. प्रमुख पाहुणे सुरेश रोजे - चौगुले यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
श्री. देऊळगावकर म्हणाले, ‘तापमान ५० अंशापेक्षा जास्तीवर पोहोचत असल्याने प्रचंड भूस्खलनासारख्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती जगभर येत आहेत. अनेक मोठ्या शहरात मोठ्या पावसाने आणि अतिवृष्टीने महापूर येऊन हाहाकार माजतो, हे एकप्रकारे नियोजनाचे अपयश आहे. याचे दुष्परिणाम आपल्याच पुढील पिढीला सोसावे लागतील. २१०० साली जगातील निसर्ग संपन्नता नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. निसर्गाला अंकित करण्याची माणसाची वृत्ती इतिहास काळापासून आजही अस्तित्वात आहे. वाहतूक समस्या व प्रदूषणामुळे स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी या गोष्टी आपण पुढील पिढीला देऊ शकत नसू तर आपण त्यांचे गुन्हेगार आहोत. या गोष्टी पुढील पिढीला मिळतील अशी व्यवस्था करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.’
मर्दा फौंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदर मर्दा, रोटरी क्लब सेंट्रलचे सेक्रेटरी श्रीकांत राठी, मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांची प्रमुख उपस्थित होती. प्रा. कपिल पिसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय काशिनाथ जगदाळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले.
-------
कार्बन उत्सर्जन जगासमोरील मोठा प्रश्न
निसर्ग आणि वातावरण बदलाचा परिणाम माणसाच्या मनावरही होतो असा अभ्यास आज झालेला आहे. यातून कार्बन उत्सर्जन हा जगासमोरील मोठा प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून जागतिक हवामान परिषदेमधून कार्बन अंदाजपत्रक मांडण्यात येते आहे. सध्या वातावरणात साधारणपणे २१०० गिगॅटन कार्बन आहे, तो २५००च्या पुढे जाता उपयोगी नाही. यासाठी २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन निम्म्यावर यावे आणि २०५० मध्ये शून्यावर यावे, तरच आपली पुढील पिढी वाचू शकेल. आपल्याकडे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे श्री. देऊळगावकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT