कोल्हापूर

कपॅसिटर बसवा, वीजहानी टाळा

CD

06345
संग्रहित
-----------
कपॅसिटर बसवा, वीजहानी टाळा
इचलकरंजीत महावितरणची मोहीम; १४ हजार ग्राहकांना नोटीस
इचलकरंजी,ता.२३ : वीजभार वाढून रोहित्रावरील दाब वाढत असल्याने ते जळून वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्याच्या दिवसात हे प्रमाण अधिक असते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी कपॅसिटर बसवण्याची मोहीम इचलकरंजी महावितरणने हाती घेतली आहे. याबाबत आतापर्यंत औद्योगिक, कृषी आणि यंत्रमाग अशा एकूण सुमारे १४ हजार वीजग्राहकांना नोटीस दिल्या असून प्रतिसाद चांगला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसासह अनेकवेळा रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी, रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी विद्युतहानी टाळण्यासाठी काही वर्षांपासून महावितरणकडून कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन केले जाते. यंदा मात्र कॅपॅसिटरची गरज ओळखून कृषिपंपासह औद्योगिक आणि २० एचपी खालील यंत्रमाग वीजग्राहकांनाही क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी इचलकरंजी महावितरण कार्यालयाने कंबर कसली असून ही मोहीम व्यापकरित्या राबवली जात आहे.
कृषी, औद्योगिक, यंत्रमाग ग्राहकांना नोटिसा दिल्या असून कॅपॅसिटर बसवण्याबाबत जनजागृती केली जात आहे. रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्‍यात आणण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यासही मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कॅपॅसिटर बसवलेले नाहीत. बसवलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली आहे. ज्यांनी कॅपॅसिटर बसवले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहनही महावितरणतर्फे केले आहे.
------
कपॅसिटर वापराच्या नोटिसा
इचलकरंजी महावितरण कार्यालय
इचलकरंजी ''अ'' विभाग - २७४०
इचलकरंजी ''ब'' विभाग - ७०४४
इचलकरंजी ग्रामीण - ४०००
-------
फ्री टेस्टिंगची सुविधा
कॅपॅसिटर बसवण्यासाठी अधिकाधिक वीज ग्राहकांनी पुढे यावे, यासाठी इचलकरंजी महावितरण कार्यालयाने अनेक सुविधा उपलबध करून दिल्या आहेत. त्यातील फ्री टेस्टिंग सुविधा ग्राहकांसाठी अनमोल ठरत आहे. कपॅसिटरची कार्यक्षमता व निश्चित प्रमाणीकरण तपासले जाते. यामुळे कपॅसिटरची गुणवत्ता समजत असल्याने या सुविधेला प्रतिसाद मिळत आहे.
------
कपॅसिटर बसवल्याचे फायदे
* योग्य दाबाचा वीज पुरवठा
* विद्युत पंप व रोहित्रे जळणे तसेच नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी
* वीजग्राहकांच्या वीज बिल व वापरात बचत
* कार्यक्षम वीज वापर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT