कोल्हापूर

नांदणी नाक्याने घेतला मोकळा श्‍वास

CD

05118
जयसिंगपूर: शहरातील नांदणी नाक्यावरील अतिक्रमण काढण्यात आली.
---------
नांदणी नाक्याने घेतला मोकळा श्‍वास
अतिक्रमणे हटवली; रस्ता रुंदीकरणातंर्गत कार्यवाही
जयसिंगपूर, ता. २७ : शहरातील नांदणी नाक्यावरील अतिक्रमणे हटवली. रस्ता रूंदीकरणातंर्गत बांधकाम विभागाने ही कार्यवाही केली. त्यामुळे तीस वर्षे असलेली अतिक्रमणे निघाल्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. वाहतुकीसाठी हा मार्गही सोयीस्कर बनला आहे.
शिरोळ-कोल्हापूर बायपास मार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला होता. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्याबाबत बांधकाम विभागाने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. यापूर्वी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे हटवली होती. मात्र तीस वर्षे नांदणी नाक्यावर असलेली अतिक्रमणे अडचणीची ठरत होती. सध्या चौडेश्वरी सुतगिरणी ते केपीटीपर्यत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे अतिक्रमणे काढावी लागणार, हे गृहित धरुन स्वतःहून व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढून घेतली. त्यामुळे या नाक्यावरून चार दिशेला जाणारे रस्ते वाहतुकीसाठी सोयीस्कर बनले आहेत. शिवाय आता उदगांव ते केपीटी मार्गाचे रुंदीकरण होणार असल्याने पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT