कोल्हापूर

शिरोळमधील ३१५८ शेतकऱ्यांना भरपाई

CD

शिरोळमधील ३१५८ शेतकऱ्यांना भरपाई
राजेंद्र पाटील यड्रावकर; अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
जयसिंगपूर, ता. ३०: ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त ३१५८ शेतकऱ्यांना राज्य सरकारच्यावतीने २ कोटी ७५ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा केली जात असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
२१ ऑक्टोबर २०२२ च्या रात्री अवकाळी पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. दुसऱ्या दिवशी शिरोळ तालुक्यात फिरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. महसूल व कृषी विभागाला नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत असे आदेश दिले होते.
तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्या माध्यमातून महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या माध्यमातून शासनास सादर केला होता. नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे निश्चित केले आहे. रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT