कोल्हापूर

साखरेचे दर स्थीर; नवी साखरही बाजारात

CD

दर स्थीर; बाजारात नवी साखर
हंगाम जोमात ः देशांतर्गत प्रतिक्विंटलचे दर ३६००-३७०० रुपये

सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २८ : राज्यात ऊस हंगाम जोमात सुरू असून नवी साखरही बाजारात येऊ लागली आहे. देशांतर्गत प्रतिक्विंटलचे दर ३६००-३७०० रुपयांवर स्थिरावले आहेत. नव्याने उत्पादित होणारी साखर लक्षात घेता कारखाने जुनी साखर विक्री करत आहेत.
राज्यात १ नोव्हेंबरपासून ऊस हंगाम सुरू झाला. मात्र, ऊस दरावरून काही जिल्ह्यातील कारखाने तीन आठवडे बंद राहिले. दराचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर कारखाने सुरू झाले. नव्याने साखर निर्मितीआधी जुनी साखर विक्रीसाठी कारखान्यांची धावपळ सुरू आहे. देशात उत्तर प्रदेश वगळता अन्य साखर उत्पादक राज्यांमध्ये साखर उत्पादन धीम्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे सध्या तरी अनेक कारखाने जुनी साखरच विकत असल्याचे चित्र आहे.
केंद्राने साखरेचे भाव वाढू नयेत यासाठी पंधरा-पंधरा दिवसांच्या अंतराने कोटे दिल्याने साखरेच्या किंमती अजूनही नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात ४२ रुपये किलोपर्यंत साखरेची किंमत गेली असली तरी कारखाना पातळीवर मात्र ही किंमत ३६००-३७०० क्वचित प्रसंगी ३८०० इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
दिवाळीदरम्यान पंधरा दिवस साखरेला चांगली मागणी होती. या दरम्यान अनेक साखर कारखान्यांना ३७०० ते ३८०० रुपयांनी साखर विकता आली. दिवाळीनंतर बहुतांश बाजारपेठेतून साखरेला मागणी काहीशी कमी आहे. देशाचा साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र अद्यापही नवी साखर अपेक्षेप्रमाणे बाजारात आली नाही. महाराष्ट्रामध्ये आंदोलनामुळे जवळजवळ गेल्यावर्षीच्या तुलनेत पन्नास टक्के साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. कर्नाटकातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. यामुळे कारखान्याकडे मोठ्या विक्रीसाठी नवी साखर अजून उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. हळूहळू कारखाने गाळपास गती घेतील. पंधरा दिवसात साखरेचे उत्पादन महाराष्ट्र, कर्नाटकमध्येही गती घेईल अशी शक्यता आहे.
----------
चौकट
शीतपेय उद्योगातील मागणीवर दर अवलंबून
गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमी होणार हे निश्चित असल्याने त्याचा परिणाम यंदा देशातंर्गत बाजारामध्येही जाणवेल. मागणी कमी, जास्त होत असली तरी एकदम मागणी कमी होण्याची शक्यता नसल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात येत आहे. अन्न मंत्रालयाने डिसेंबरसाठी २४ लाख टनांचा कोटा दिला आहे, जो नोव्हेंबरच्या तुलनेत १ लाख टन अधिक आहे. आगामी काळात शीतपेय उद्योगातून मागणी कशी राहते यावरच साखरेचे दर कितपत वाढतील हे निश्चित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT