कोल्हापूर

जिल्ह्याला ३ हजार कोटीच्या पीककर्जाचे उद्धिष्ट

CD

08011

पीककर्ज आलेख पाठवला आहे. संग्रहित फोटो वापरणे

००००

जिल्ह्याला तीन हजार कोटींच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट

७१ टक्के वाटप; खरिपासाठी २.१८ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २३ : खरीप व रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी (२०२४-२५) कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांना ३ हजार कोटी ८५ लाख रुपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये खरिपासाठी दोन हजार १२७ कोटी १० लाख, तर रब्बीसाठी खरसुंडी एक हजार ७२२ कोटी ९० लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत खरिपासाठी दोन लाख १८ हजार ८६१ पैकी ६७ टक्के शेतकऱ्यांना ७१ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
यावर्षी मान्सून वेळेत दाखल होईल, या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतीच्‍या मशागतीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, तूर, उडीद, मका, नाचणी, कडधान्य अशा पिकांसाठीची कामे गतीने सुरू आहेत. गतवर्षी पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांचे दिव्य पार करावे लागले होते. बहुतांश शेतकऱ्यांना जाचक अटींमुळे यापासून वंचित राहावे लागले होते.
गतवर्षी २०२३-२४ मध्ये ५९ हजार ३२ शेतकऱ्यांची खरिपासाठी, तर ५८ हजार ६३१ शेतकऱ्यांची रब्बीच्या पीक कर्जासाठी निवड करण्यात आली होती. गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. उत्पादन खर्चदेखील मिळाला नव्हता. भाजीपाल्याला दर नसल्याने शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला होता. यावर्षी देखील पाणी टंचाईमुळे पिकांना फटका बसला असताना, खरिपाला अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसेल का, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
....

यांत्रिक शेतीने उत्पादन खर्च वाढला
गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी मनुष्यबळाच्या आधारावरच बहुतांश शेतीची कामे केली जात होती. कालांतराने यांत्रिकी शेतीने मनुष्यबळाची जागा घेतली. परिणामी, मजुरीपेक्षा यंत्रांचा खर्च वाढत गेला. शिवाय नैसर्गिक संकटे आणि शेती मालाचा हमीभाव यामुळे उत्पादन खर्च आणि नफ्याचा ताळमेळ बसणे कठीण बनले आहे.
....
बचत गटाकडेही ओढा
जिल्ह्यातील गावागावांत बचत गटांचे जाळे निर्माण झाले आहे. बहुतांश कुटुंबातील महिला कोणत्या ना कोणत्या बचत गटाच्या सदस्य आहेत. शेती कामासाठी पैशांची गरज भासल्यास शेतकरी आता बँकेऐवजी बचत गटाचा रस्ता धरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत - दलवाई

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT