फोटो वापरणे
आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने-बापू
---
बापू... जिद्द, जनसेवा, सत्कार्याचा संगम
लीड
अनुकूल परिस्थितीत कोणीही यश संपादन करेल, पण प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून विश्व निर्माण करून कार्याचा डोंगर उभा करणारी व्यक्ती दुर्मीळ असते. असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने-बापू...
स्वातंत्र्यसेनानी, राजकीय आणि सहकार चळवळीतील नेते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षातून सामाजिक आणि राजकीय चळवळीस त्यांनी सुरुवात केली. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. शिरोळ तालुक्यात त्यांची स्वतःची ओळख तयार झाली. आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने-बापू यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त..
-------------
लोकांच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी रत्नाप्पा कुंभार सहकारी गृहनिर्माण सोसायटी, कृष्णा सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून लोकांना हक्काचा निवारा मिळवून देण्याचे कार्य केले. महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून अनेक लोकांना कर्ज मिळवून देऊन व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. छत्रपती शाहू औद्योगिक वसाहतीची स्थापना करून शेकडो कारखाने उभे केले. वस्त्रोद्योगात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी, इगतपुरी (नाशिक) येथे स्थापन करून रोजगाराचा प्रश्न सोडविला.
चेंबूर मुंबई येथे मुक्ताई गृहनिर्माण संस्था स्थापन केली. चिंचवाड तालुका शिरोळ येथे हायस्कूल सुरू केले. त्यांनी कोल्हापूर येथे महिला औद्योगिक वसाहतीचा संकल्प सोडला आहे. त्यांनी अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लढविल्या. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर २०१७ ला शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी होऊन चांगले कार्य केले.
जनतेची कामे व्हायची असतील तर राजकीय शक्ती पाहिजे म्हणून २०१९ ची हातकणंगले राखीव मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारीवर लढत दिली. या निवडणुकीत यश मिळाले नाही. पण मतदारसंघातील लोकांत संपर्क ठेवला. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून पायाला भिंगरी बांधून जनसंग्रह वाढविला व लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. यामुळेच नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बापूंना हातकणंगले मतदारसंघातील मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी केले.
बापूंना आमदारकीच्या कार्यकाळात दरवर्षी येणारा महापुराचा कायमस्वरूपी तोडगा काढावयाचा आहे. तालुका क्रीडा संकुल, आरोग्य संकुल मार्गी लावायचे आहे.
अपंग, दलित, मागासवर्गीय आणि महिलांच्या उन्नतीसाठी पतसंस्था, अपंगांसाठी टेलिफोन बुथ, औद्योगिक संस्था उभ्या केल्या. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले. सुप्रसिध्द अभिनेत्री हेमामालिनी यांचासुध्दा कार्यक्रम यशस्वी केला.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या ठिकाणी भव्य २०० कोटींचे राष्ट्रीय स्मारक उभे करावयाचे आहे. या शिवाय शक्तिपीठ मार्ग, नागपूर-रत्नागिरी महामार्गात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांनासुध्दा योग्य भरपाई मिळवून देणे आदी संकल्प ते तडीस नेल्याशिवाय राहणार नाहीत. आज १ जून रोजी त्यांच्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्व संकल्प तडीस नेण्याची शक्ती मिळो, त्यांच्या हातून हातकणंगले विधान सभा मतदारसंघाचा विकास होवो, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो, हीच सदिच्छा.
- सुभाष पाटील (मामा), नागाव, संचालक, वारणा साखर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.