कसबा बीड ता. ४ ः नव्याने विकसित होत असलेल्या बालिंगा–दाजीपूर राज्य महामार्गाच्या भूसंपादनाच्या संदर्भात वारंवार मोठी विसंगती समोर येताना दिसत आहे. यामध्ये करवीर व राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. याबाबत नुकसानभरपाई मिळण्यासाठी घानवडे ग्रामस्थांनी आमदार चंद्रदीप नरके यांना निवेदन दिले.
जुना जिल्हा मार्गावरील भूसंपादन १९८५ मध्येच झाले आहे. त्याची जुनी नोंद सडोली दुमाला ते कसबा आरळे दरम्यान स्पष्टपणे दिसून येते. मात्र या प्रक्रियेत घानवडे पूर्णपणे वंचित राहिल्याचे उघड दिसत आहे. तेरसवाडी फाटा ते घाणवडे, मांजरवाडीपर्यंतच्या रस्त्याचे भूसंपादन झालेले नाही. यासाठी २१.५० हेक्टर जमीन बाधित होणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. पण दखल शासन घेताना दिसत नाही. गतवर्षी रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर करवीर व राधानगरी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी शासनस्तरावर व संबंधित काम करणाऱ्या रचना कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन व आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला. पण दाद घेतली जात नाही. आमदार नरके यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, सोमवारी प्रांत कार्यालयात अधिकारी व ग्रामस्थांची बैठक होणार आहे, असे सांगितले. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड (करवीर) चे सचिव सरदार पाटील, सुनील पाटील, शिवाजी पाटील, संग्राम पाटील, रवींद्र पाटील, अजित पाटील, परसू पाटील, विष्णू पाटील, शंकर जाधव, कुलदीप पाटील, संदीप पाटील, केरबा पाटील, बाजीराव जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.