कोल्हापूर

कबनूरमधील उरुसाच्या पाळण्याची निविदा २१ लाख ७५ हजार रुपयांची

CD

पोषण आहार मदतनीस, स्वयंपाकींच्या
मानधनात एक हजार रुपयांची वाढ
म्हाकवे : शालेय पोषण आहार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य फेडरेशनने गेली तीन वर्षे केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. मदतनीस आणि स्वयंपाकी यांचे मानधन पंधराशे रुपयांवरून आता अडीच हजार रुपये करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र फेडरेशन अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील यांनी दिली. या वेळी उपजिल्हाध्यक्ष तानाजी कुंभार, जिल्हा सचिव निवेदिता वासनकर, कागल तालुका अध्यक्ष रामचंद्र दंडवते, महादेव चौगुले, संतोष देसाई, संभाजी पाटील उपस्थित होते. राज्य फेडरेशनने खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले होते. या लोकप्रतिनिधींनी शिक्षणमंत्री, अर्थमंत्री यांना पत्र पाठवून मानधन वाढवून देण्यासाठी शिफारस केली होती. संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे शासनाने मानधन दोन हजार पाचशे रुपये केले. मानधन वाढ केल्याने समाधान व्यक्त होत आहे.


....

01252

शिंपे ः येथील तलावाची खचलेली संरक्षक भिंत.


सरूड : शिंपे (ता. शाहूवाडी) येथील गाव तलावाची मुख्य रहदारीच्या रस्त्यालगतच असणारी संरक्षक भिंत जवळपास पूर्ण खचली आहे. तर भिंतीचा काही भाग तलावात कोसळला असल्याने मोठा अनर्थ घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. २० वर्षांपूर्वी ही भिंत तलावासाठी संरक्षक कठडा म्हणून बांधली होती. तलावाच्या भिंतीला लागूनच सरूड- मलकापूर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. या मार्गावरून सरूड मलकापूरमार्गे रत्नागिरी अशी अवजड वाहनांचीही नेहमीच वर्दळ असते. शिवाय शाळेच्या बस, ऊस वाहतूक व प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर येथून चालते. अवजड वाहतूक या रस्त्यावरुन चालत असल्याने पूर्ण रस्ताच खचून तलावात ढासळेल की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

.....
कबनूरमधील उरुसाच्या पाळण्याची
निविदा २१ लाख ७५ हजार रुपयांची

कबनूर ः येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुसानिमित्त उरूस समितीच्या वतीने आयोजित पाळणा निविदा सोडत काढण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त रक्कमेची निविदा मिरजेच्या मेहबूब पटेल यांची २१ लाख ७५ हजार रुपयांची असल्याने पाळण्याचा ठेका त्यांना देण्यात आल्याची माहिती सरपंच शोभा पोवार यांनी दिली. जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरूस १६ मार्च रोजी आहे. त्यानिमित्त ग्रामपंचायत सभागृहात पाळणा निविदा सोडत काढण्यात आली. निविदांमध्ये तेरा लाख ते पंधरा लाख रुपयेपर्यंत रक्कम असल्यामुळे फेरनिविदा मागविल्या. त्यामध्ये २१ लाख ७५ हजार रुपयांची निविदा मिरजेच्या मेहबूब पटेल यांची असल्याने पाळण्याचा ठेका त्यांना देण्यात आला. या वेळी उपसरपंच सुधीर पाटील, प्रमोद पाटील, बबन केटकाळे, सुधीर लिगाडे, सुनील काडाप्पा, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.
...
81785, 81784
सैनिक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील

चंदगड : येथील सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील शेवाळे व उपाध्यक्षपदी हनुमंत दोरुगडे अडकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यानंतर निवडणूक अधिकारी पी. आर. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी संचालक दशरथ पाटील, रमेश पाटील, मारुती पट्टेकर, परशराम पाटील, मारुती नाईक, जयवंत चांदेकर, दयानंद पाटील, संभाजी पाटील, लक्ष्मण कांबळे, माधवी कांडर, वैशाली पाटील उपस्थित होते. व्यवस्थापक सुभाष गवळी यांनी आभार मानले.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT