कोल्हापूर

टुडे २

CD

लोगो- संघर्ष कबनूर नगरपरिषदेसाठी- भाग ४


उपोषणातून नगरपरिषदेची मागणी ऐरणीवर
कृती समितीचा सातत्याने पाठपुरावा; सह्याची मोहीम, निवेदने, मोर्चा, रास्ता रोको

रवींद्र पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. २४ ः कबनूरला स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. स्वतंत्र नगरपरिषदेच्या मागणीसाठी नागरिकांची वैयक्तिक सह्यांची मोहीम देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात राबवली. चार तासांत अडीच हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शवला. युवकांनी कबनूर नगरपरिषद कृती समिती स्थापन करून नगरपरिषदेसाठी पाठपुरावा सुरू केला. स्वतंत्र नगरपरिषद होण्यासाटी निवेदने, मोर्चा, रास्ता रोको आदी आंदोलने केली.
कबनूरला स्वतंत्र नगरपरिषद झाली पाहिजे, या मागणीसाठी कृती समितीने २०२० मध्ये साखळी उपोषण सुरू केले. साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी खासदार धैर्यशील माने यांनी भेट देऊन ‘कबनूर स्वतंत्र नगरपरिषदेबाबत मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांच्याबरोबर चर्चा करू‘, कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घालून देऊन नगरपरिषद होण्यासाठी प्रयत्न करू‘ असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.
शासनाने कबनूर ग्रामपंचायतीकडे कबनूर स्वतंत्र नगरपरिषद करण्याबाबत ठराव, इचलकरंजी व कोल्हापूर महापालिकेपासून कबनूरच्या अंतराची माहिती मागवली. मात्र, त्यावेळी ग्रामपंचायतीने ठराव दिला नाही. त्यामुळे नगरपरिषद कृती समितीतर्फे ५ जुलै २०२२ कबनूर नगरपरिषद मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. २३ दिवसांच्या साखळी उपोषणानंतर त्यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. त्यावेळी दोन उपोषणकर्त्यांना इस्पितळात दाखल केल्यानंतर या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिले. तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी २६ जानेवारी २०२३ ला प्रजासत्ताक दिनी कबनूर नगरपरिषदेची उद्घोषणा होईल, असे सांगून बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी सांगता करत नगरपरिषदेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. पण त्यानंतर दोन वर्षे होऊन नगरपरिषद झाली नाही. २०२४ कृती समितीच्या उपोषणावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन कबनूर स्वतंत्र नगरपरिषदसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
--
कृती समितीच्या मागे
उभे राहण्याची गरज
कबनूर नगरपरिषद कृती समितीने नगरपरिषदेसाठी सातत्याने लढा चालूच ठेवला आहे. गावातील सर्वच राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून नगरपरिषद कृती समितीच्या तरुणांमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. गट तट विसरून राजकीय इच्छाशक्ती वापरली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT