कोल्हापूर

कसबा सांगाव: पंचतारांकित मधील दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर, उन्हाळ्यात कमी पावसाळ्यात वाढ, ठोस उपाययोजना करण्याची गरज.

CD

02061
कसबा सांगाव ः येथील माळी वस्तीजवळ ओढ्याला आलेले प्रदूषित सांडपाणी.
--
कागल एमआयडीसीतील
सांडपाण्याचा स्थानिकांना फटका
परिसरातील विहिरी, नाले प्रदूषित; अनेक आंदोलने, तरीही दुर्लक्ष
कृष्णात माळी ः सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. १६ ः कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील दूषित पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. १५ वर्षांपासून काही उद्योग कंपन्यांनी रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडण्याचा प्रकार सातत्याने चालविला आहे. यामुळे परिसरातील पाण्याचे सर्वच स्त्रोत प्रदूषित झाले आहेत. याबाबत अनेकवेळा तक्रार दाखल होऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नाही.
परिसरातील २० विहिरी, अनेक कूपनलिका, विविध पाण्याचे स्त्रोत दूषित बनले आहेत. दूषित पाण्याविरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने केली, निवेदने दिली, वादावादीचे प्रकारही घडले, मात्र यावर निर्बंध घातले नाहीत. यामुळे भविष्यात एमआयडीसीपासून पाच किलोमीटरवर असलेली दूधगंगा नदी तमदलगे परिसरातील पाणी प्रदूषणाच्या विळख्यात येण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

कागल औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेनंतर साधारण १४०० उद्योग सुरू झाले आहेत. अनेक कंपन्यांत रसायनयुक्त सांडपाणी मोठ्या प्रमाणावर तयार होते. मात्र, शुद्धीकरणासाठी येणारा खर्च टाळण्यासाठी बहुतांशी कंपन्यांमधील प्रदूषित पाणी उघड्यावर सोडले जाते.
आठ, दहा वर्षांपासून कसबा सांगाव परिसरातील कालवे, ओढे दूषित पाण्याच्या विळख्यात आहेत. अनेक जनावरे, पक्षी, प्राणी दूषित पाण्यामुळे मृत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काशिनाथ ओढा परिसरातील माळी मळा आणि अन्य भागात विहिरीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.

--
कोट
कागल एमआयडीसीतील काही औद्योगिक कंपन्यांतून दूषित पाणी कॅनॉलमध्ये सोडले जाते. माळी मळा व परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. शेतातील पिकांवर परिणाम होत आहे.
- बाळासाहेब निंबाळकर, पर्यावरणप्रेमी
-
रसायनयुक्त पाणी थेट कालव्यात, ओढ्यात सोडले जाते. पाटील, हासुरे, माळी मळा व परिसरातील अनेक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. जनावरांना व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. भविष्यात जमीन नापीक होण्याची भीती आहे. एमआयडीसी कार्यालय, जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळांकडे तक्रारी करूनही दखल घेतली नाही.
- अनिल माळी, स्थानिक नागरिक
-
कागल औद्योगिक वसाहतीला अनेक ठिकाणी मागे एक वेळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पुन्हा येथे एकदा पाहणी करून गांभीर्याने चौकशी करू. आवश्यकतेनुसार कारवाई केली जाईल.
- सुशीलकुमार शिंदे, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.
--
दृष्टिक्षेपात कागल एमआयडीसी
- एकूण उद्योग- १४००
- सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी (सीईटीपी) एकच शासकीय केंद्र
- केंद्राची क्षमता १० एमएलडी
- दिवसाला साधारण २ ते २.८ एमएलडी सांडपाणी केंद्रात
- एक हजार लिटर सांडपाणी प्रक्रियेसाठी २० रुपये खर्च
- काही कंपन्यांचे स्वतःचे शुद्धीकरण केंद्र
- यात ७५ टक्के प्रक्रिया करून उर्वरित सांडपाणी पुढील प्रक्रियेसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

FDA Crime : सणासुदीच्या काळात ‘एफडीए’ची कारवाई; ५६ लाखांचा अन्नसाठा जप्त, पुणे विभागातील १२ आस्थापनांवर छापे

SCROLL FOR NEXT