कोल्हापूर

देऊळवाडीत महाराजस्व अभियान

CD

01046

देऊळवाडी: महाराजस्व अभियानात ट्रॅक्टर वितरण करताना तहसीलदार अश्विनी अडसूळ, जि.प.सदस्या रोहिणी आबिटकर,सरपंच सुनीता पाटील व अन्य मान्यवर.
...

शासनाच्या विविध विभागांचा
कारभार गतिमान करणार

तहसीलदार अश्विनी अडसूळ; देऊळवाडीत महाराजस्व अभियान

कडगाव ता.१४: भुदरगड तालुक्यातील शासनाचे विविध विभाग लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी केले. त्या देऊळवाडी (ता.भुदरगड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित महाराजस्व अभियानात बोलत होत्या. सरपंच सुनिता पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर प्रमुख उपस्थित होत्या.
तहसीलदार अडसूळ म्हणाल्या, ‘देऊळवाडी ग्रामपंचातीने नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. ‌अशा ग्रामपंचायतींचा गौरव झाला पाहिजे.’
सुशिलाताई आबिटकर हेल्थ फौंडेशनच्या विजयालक्ष्मी आबिटकर म्हणाल्या, ‘गोरगरीब रूग्णांना आजारपणासाठी आयुष्यामान भारत गोल्डन कार्ड आधार ठरेल. हेल्थ फौंडेशनच्यावतीने मोफत आयुष्यामान भारत गोल्डन कार्ड वाटप केले जात आहे.’
यावेळी महसूलचे विविध दाखले, पेन्शन योजनांची पत्रे, आधार कार्ड, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड, शेती औजारे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
रविराज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी कृषि अधिकारी किरण पाटील, मंडल अधिकारी आर.के.तोळे, उपसरपंच कविता सावर्डेकर, सदस्य सुभाष पाटील, संभाजी कांबळे, बाबूराव पाटील, सुनिता पाटील, संगीता कांबळे आदी उपस्थित होते. भाग्यश्री पाटील यांनी सूत्रंचालन केले. ग्रामसेवक कुलदीप देसाई यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT