कोल्हापूर

शेळोली : आशा स्वयंसेवीका निवड वाद

CD

शेळोलीत आशा स्वयंसेविका
निवड वादाच्या भोवऱ्यात

ग्रामसभेचे उद्या आयोजन ः निवडीकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
कडगाव, ता. ११ : शेळोली (ता. भुदरगड) येथील ‘आशा स्वयंसेविका’ भरतीचा वाद गेले वर्षभर गाजत आहे. रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. यासाठी शुक्रवारी (ता.१३) ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे.
शेळोली येथे आशा स्वयंसेविका म्हणून सविता साताप्पा सुतार काही वर्षे काम पाहत होत्या. त्यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले. या रिक्त पदावर ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने कल्पना संजय जावडेकर यांची निवड केली होती. मात्र, त्यांच्या निवडीला शीतल दिलीप चव्हाण यांनी ग्रामपंचायतीकडे आक्षेप घेतला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ विभागाकडे तक्रार करून दाद मागितली होती. त्यानुसार रितसर तपासणी झाल्यावर जावडेकर यांच्या निवडीला स्थगिती मिळाल्याने निवड रद्द करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुन्हा जाहीर नोटीस काढून अर्ज मागवून पुन्हा आशा स्वयंसेविका निवड घ्या, असे आदेश ग्रामपंचायतीला मिळाले आहेत.
त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने अर्ज मागविले आहेत. यामध्ये एकूण नऊ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार शिक्षण, अनुभव, संभाषण कौशल्य तसेच विधवा व परित्यक्ता आदी निकष ठरवून गावसभेत वाचन करूनच पात्र उमेदवाराची फेरनिवड करण्यासाठी शुक्रवारी (ता.१३) गावसभा बोलाविली आहे. त्यामुळे ग्रामसभेत आशा स्वयंसेविका म्हणूनच कोणाची निवड होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Live Update : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सर्वधर्म रोजा इफ्तारचे आयोजन

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

SCROLL FOR NEXT