कोल्हापूर

मुख्यमंत्र्यांकडे मागणी

CD

बालिंगे पुलानजीक पाईप
ड्रेनऐवजी मोठ्या मोऱ्या बांधा

चंद्रदीप नरके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कुडित्रे, ता. २ : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा पुलादरम्यान रस्त्याला पाईप ड्रेनऐवजी, स्लॅबड्रेन मोठ्या मोऱ्या बांधाव्‍यात, अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्र्यांनी योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
निवेदनाचा आशय असा : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग १६६ -जी कोकणाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. सध्या रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर आहे. बालिंगेजवळ पुलाच्या दोन्ही बाजूला सखल रस्ता असल्याने रस्त्याची उंची वाढवणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने भरावाचे काम सुरू आहे. सध्या कामाच्या अंदाजपत्रकामध्ये येथे पाईप ड्रेन करणे प्रस्तावित आहे. महापूर आणि अतिवृष्टीच्या दिवसात हे ठिकाण पूर्ण पाण्याखाली जाते. गतवर्षी महापुरावेळी येथे प्रत्यक्ष भेट दिली असून पूरग्रस्तांना मदत केली आहे. पाईप ड्रेनमुळे पुरेशा प्रमाणात पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे शेजारील गावांना धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे येथे पाईप ड्रेनऐवजी पुलाच्या दोन्ही बाजुला स्लॅब ड्रेन बांधणे आवश्यक आहे. स्लॅब ड्रेनबाबत संबंधितांना सूचना कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली. याबाबत योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT