कोल्हापूर

करवीर महोत्सवाचे वाकरे येथे आयोजन

CD

करवीर महोत्सवाचे
वाकरे येथे आयोजन
कुडित्रे, ता. २६ : व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर या संस्थेतर्फे वाकरे (ता. करवीर) येथील विठाई-चंद्राई हॉल शेजारील मैदानात २८ एप्रिल ते १ मेअखेर करवीर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्‍घाटन खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार महेश लांडगे, आमदार जयंत आसगांवकर, कार्यकारी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, वाकरेच्या सरपंच अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता होणार आहे, अशी माहिती व्हिजन चॅरिटेलबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी दिली.
घोरपडे म्हणाले, ‘‘महोत्सवाअंतर्गत चार दिवस आंबा, तांदूळ व कृषी प्रदर्शन, शेती अवजारे व बियाण्यांचे स्टॉल, महिलांसाठी कुकुंमार्चन, मेहंदी व मेकअप स्पर्धा, झिम्मा फुगडी स्पर्धा, जात्यावरच्या ओव्या, खेळ पैठणीचा, देवीचा जागर, महिलांसाठी आरोग्य शिबीर, बालगोपांलासाठी बालजत्रा, विविध खाद्य पदार्थ, जादुचे प्रयोग, व्याख्याने, नाटक, भजन, गायन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच बचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरीता या महोत्सवात सुमारे २०० स्टॉल उपलब्ध करुन दिले आहेत. या महोत्सवास नागरिकांनी भेट द्यावी.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT