कोल्हापूर

करवीर महोत्सवात सुनिता पाटील लाखाच्या पैठणीच्या मानकरी, शिल्पा पाटील ठरल्या उपविजेत्या

CD

05116
लाखाच्या पैठणीच्या
सुनीता पाटील मानकरी
करवीर महोत्सव; शिल्पा पाटील ठरल्या उपविजेत्या

कुडित्रे, ता. १० : व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित करवीर महोत्सव २०२४ मधील ‘पैठणी लाखाची’ स्पर्धेत सुनीता रावसाहेब पाटील मानकरी ठरल्या. दुसऱ्या क्रमांकाच्या २१ हजाराच्या पैठणीच्या शिल्पा संजय पाटील मानकरी ठरल्या. विजेत्या सुनीता पाटील आणि शिल्पा पाटील यांना ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे आणि डॉ. संगीता निंबाळकर यांच्या हस्ते लाखाची पैठणी आणि बक्षिसे देण्यात आली.
वाकरे फाटा येथे करवीर महोत्सव सुरू आहे. महोत्सवात खेळ पैठणीचा कार्यक्रमात विजेत्यास लाखाची पैठणी व इतर बक्षीसे असल्याने हजारो महिलांनी उपस्थिती नोंदवली होती. दुपारी दोनपासून विविध खेळांत सहभागी करून घेऊन महिलांना अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी होती. फिल्मी डायलॉग, हजरजबाबीपणा, बुद्धिमत्ता खेळ, नृत्य आणि अन्य बौद्धिक, शारीरिक आणि कौशल्यपूर्ण खेळांचा समावेश होता. स्पर्धा रात्री १२ पर्यंत सुरू राहिल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पाच महिलांची लाखाच्या पैठणीसाठी अंतिम फेरीत निवड झाली. सुनीता पाटील यांची परीक्षकांनी लाखाच्या पैठणीसाठी निवड केली. शिल्पा पाटील उपविजेत्या ठरल्या. तृतीय क्रमांक नीता सर्जेराव चव्हाण आणि चतुर्थ वृषाली माने पाचव्या क्रमांकाच्या मानकरी अश्विनी सुरेश सूर्यवंशी ठरल्या. ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे महिलांनी ऋण व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT