07907
प्रो-लीगमुळे कुस्ती क्षेत्राला ग्लॅमर
खासदार धनंजय महाडिक ः कुडित्रेत करवीर कुस्ती संकुलनाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ४ : ‘‘ग्रामीण भागातील मल्लांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, या हेतूने सुभेदार शिवाजी पाटील यांनी उभे केलेले करवीर कुस्ती संकुलन कौतुकास्पद आहे. प्रो-लीगमुळे कुस्ती क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. या संकुलनातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडतील आणि त्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील,’’ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कारखाना परिसरात सुभेदार शिवाजी पाटील यांनी उभारलेल्या करवीर कुस्ती संकुलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नल विनोदकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, अजित नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘संकुल आदर्श पद्धतीने उभारले असून, येथे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन शक्य होईल. शिवाजी पाटील यांनी सैन्यदलात सेवा बजावताना देशाचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारे मल्ल ऑलिंपिक पदकाची उणीव भरून काढतील.’’
प्रास्ताविकात सुभेदार शिवाजी पाटील म्हणाले, ‘‘कुस्तीमुळेच ओळख मिळाली आणि मी घडलो. ग्रामीण भागातील प्रतिभावान मल्लांना व्यासपीठ मिळावे, यासाठीच हे संकुल उभारले. यासाठी वडील कृष्णात पाटील, विष्णू पाटील आणि पत्नी नीलम पाटील यांचे सहकार्य मिळाले.’’
यावेळी कर्नल विनोदकुमार पाटील व पैलवान विलास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, संभाजी पाटील, सुभेदार अरुण पाटील, एकनाथ पाटील, पुंडलिक पाटील, बी. जी. पाटील, राजाराम मगदूम, राजाराम पाटील, राम सारंग यांच्यासह मल्ल उपस्थित होते. नीलम पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.