कोल्हापूर

कागल : अजित पवारांच्या उपस्थितीत विकास कामांची उद्घाटने

CD

04788

आमदार मुश्रीफ यांच्याकडून
कागलला विकासाचे वैभव

अजित पवार; विविध विकासकामांचे लोकार्पण


कागल, ता. १७ : कागल नगरपरिषद व राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून पूर्ण विकासकामांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. उद्घाटनानिमित्ताने झालेला विकास पाहून अजित पवार भारावून गेले. आमदार मुश्रीफ यांनी कागलमध्ये विकासाचे वैभव निर्माण केले, असे ते म्हणाले.
श्रमिक वसाहतीतील ७५ लाखांतून राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या नावाने असलेल्या बगीचाचे लोकार्पण, अधिपती श्रीमंत जयसिंगराव महाराज (बाळ महाराज) यांच्या बसस्थानकाजवळच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व निपाणीवेस येथील श्री राधाकृष्ण मंदिराचा विस्तारित सभामंडप या विकासकामांचे लोकार्पण झाले.
यावेळी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, प्रकाशराव गाडेकर, शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, प्रवीण काळबर, चंद्रकांत गवळी, सुनील माने, रणजीत बन्ने, सौरभ पाटील, अरुण पाटील, अस्लम मुजावर, संदीप भुरले, दत्तात्रय पाटील, कृष्णात मेटील, अर्जुन नाईक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT