कोल्हापूर

कागल : ( सुधारित) सहाय्यक भवनचे उद्घाटन उत्साहात

CD

05159
कागल : तालुका देखरेख सहकारी संस्था नूतनीकरण व सहकार भवन उद्घाटनप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ,युवराज पाटील, भैय्या माने, चंद्रकांत गवळी व इतर.
....

पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात
सहकाराचे योगदान मोठे

आमदार हसन मुश्रीफ ः कागलमध्ये सहकार भवनचे उद्घाटन

कागल, ता. २९ : ‘पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळीचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र विविध क्षेत्रात प्रगतीशील आणि सक्षम झाला आहे. महाराष्ट्राच्या विकासात पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. येथील सक्षम सहकार चळवळ राज्याला मार्गदर्शक ठरेल,’ असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागल तालुका देखरेख सहकारी संस्था नूतनीकरण व सहकार भवन उद्घाटन समारंभ येथील शाहू वाचन मंदिरात झाला. यावेळी आमदार मुश्रीफ बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘सहकार चळवळीचा पाया कागल तालुक्यात घट्ट झाला आहे. सहकारातील विविध संस्था कार्यक्षम असतील तर सहकारात लक्षवेधी काम होणार आहे. सहकार चळवळ स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे. जिल्हा बँक सक्षम असेल तर सोसायटी सक्षम होतील. राजकारणात मला आमदार, मंत्री होण्यासाठी सहकाराचा मोठा अनुभव मिळाला. सेवा सोसायटी या सहकाराची जननी आहे. त्यामुळे विकास सेवा संस्था गटसचिव आणि जिल्हा बँक या सहकारातील सर्वच संस्थांबद्दल माझ्या मनामध्ये अभिमान आणि आदराची भावना आहे.’
भैय्या माने म्हणाले, ‘कागल तालुक्याला सहकाराची मोठी परंपरा आहे. तालुक्यात सहकाराचा पाया प्रगल्भ आहे. सर्वांच्या सहकार्यातून सहकार भवन ही सुसज्ज इमारत उभी राहिली आहे.’ यावेळी राज्य सचिव संघटनेचे सदस्य कुंडलिक खोडवे, ए. एम. चोपडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत सचिव संघटनेचे युवराज पाटील यांनी केले. आभार कृष्णात पाटील यांनी मानले. कार्यक्रमास ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, चंद्रकांत गवळी, केशव पाटील, जीवन शिंदे, संभाजी पाटील, नाना कांबळे, प्रशांत घाटगे यांच्यासह सहकारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व गटसचिव, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT