कोल्हापूर

तंटामुक्त समिती केवळ कागदोपत्रीच

CD

तंटामुक्त समिती
केवळ कागदोपत्रीच
कागल, ता. १ : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून गावागावांमध्ये नेमलेल्या तंटामुक्त समित्या पूर्वी जोमाने काम करीत होत्या. अलिकडे गावातील तंट्याकडे या समित्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यात सतत गावातील किरकोळ वादाच्या तक्रारी येत असल्याने तंटामुक्ती समिती फक्त कागदोपत्रीच उरली आहे.
गावातील किरकोळ वाद-तंटे गावातच सामोपचाराने मिटवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात केली होती. यामुळे गावागावातील तंटे कमी झाले होते. गावांमध्ये नेमलेल्या समित्याही जोमाने काम करीत होत्या. भावकीत उद्‌भवणारे तंटे सोडवण्यासाठी तंटामुक्ती समिती नेमण्यावर भर दिला जात होता. गावातील छोटे-मोठे तंटे पोलिस ठाण्यात जाण्या अगोदरच मिटत होते.
गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यासाठी ग्रामपातळीवर तंटामुक्त समित्या गठीत करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची निवड केली होती. त्यानंतर या मोहिमेला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने पोलिसांवरचा ताण कमी होऊन जातीय सलोखा राखला जाऊ लागला होता. मात्र, सध्या या अभियानाकडे शासनाने पाठ फिरवल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत दरवर्षी निवडल्या जाणाऱ्या समित्या केवळ नावालाच उरल्या असून सरकारी अनास्थेमुळे समित्यांचे अस्तित्व शिल्लक राहिले नसल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील नागरिक फक्त तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यात जोर दिला जात आहे. या अभियानाला पूर्वीचे रूप आणण्यासाठी क्रियाशील सदस्यांची निवड करून चांगल्या उपक्रमांसाठी शासनस्तरावर प्रयत्नांची गरज आहे. तंटामुक्त समिती गरजेचे असून या समितीला पुन्हा उभारी देणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

India Next ODI Series: अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला, आता भारताची पुढची वनडे मालिका कधी? पाहा वेळापत्रक

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

SCROLL FOR NEXT