06351
कागल : चोरट्यांनी घरातील विस्कटलेले कपाट.
...
कागलमध्ये घरफोडीत
दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला
कागल, ता. ३ : येथील सणगर गल्लीत घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने घरफोडी केली. यात तिजोरीतील साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने व अकरा हजार रुपये रोख असा तीन लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याबाबतची फिर्याद रमेश विष्णू सनगर (वय ६६) यांनी कागल पोलिसांत दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी, रमेश सणगर हे भाडेकरूंचा भाडेकरार करण्यासाठी पुण्याला गेले होते. ते आल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आले. शनिवारी रात्री झालेल्या या घरफोडीत चोरट्याने कपाटातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन तोळ्यांचा सोन्याचा पोहे हार, दोन तोळ्यांची सोन्याची मोहन माळ व अकरा हजार रुपये रोख असा तीन लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. पण, श्वानपथक घराच्या परिसरातच घुटमळले. उपविभागीय अधिकारी सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, सहायक पोलिस निरीक्षक सुनीता शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.