शिवजयंतीनिमित्त आज
कागलमध्ये विविध उपक्रम
कागल, ता. १८ : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१९) शाहू ग्रुप व छत्रपती शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी आठ वाजता शिवज्योतीचे आगमन होईल. त्यानंतर बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास व नगरपालिकेसमोरील पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर त्यांच्या हस्ते उत्सवमूर्तीस विधिवत जलाभिषेक होईल. दुपारी साडे बारा वाजता शिवजन्मोत्सव सोहळा श्रेयादेवी घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. शिवजयंती सोहळ्यात सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकोत्सव समितीच्या वतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.