कोल्हापूर

जरगनगर मुख्य रस्त्याची दुरवस्था

CD

04499
कंदलगाव : जरगनगर रस्त्यावर असे सांडपाणी साचलेले असते.

जरगनगर मुख्य रस्त्यावरील
सांडपाणी, खड्डयामुळे कसरत
प्रकाश पाटील : सकाळ वृतसेवा
कंदलगाव, ता. १३ : रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, ड्रेनेज चेंबरचे खड्डे, पदपथांची वाताहत, गतिरोधकांचे उंचवटे यासह बाजू पट्टयांचा अभाव अशा अनेक समस्येत जरगनगर मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवासी नागरिकांची कसरत सुरू आहे.
पाचगाव डॉ. आंबेडकर कमानीपासून ते रामानंदनगर ओढ्यापर्यंत असणाऱ्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरचा धोका असून मोठ्या प्रमाणत सांडपाणी वाहत आहे. या रस्त्यावरून पाचगाव, गिरगावसह नंदगाव भागातील शेतकरी, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरु असते. या रस्त्यावर असलेले खड्डे, गतिरोधकांमुळे प्रवाशांची कसरत होत आहे. या संपूर्ण रस्त्याच्या पदपथांचा पत्ताच नसल्याने अनेकदा येथे अवजड वाहने थांबून असतात. अशावेळी प्रवासी व पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
--------------
चौकट
बाजू पट्टयांचा धोका..
रामानंदनगर ओढ्यापासून पाचगावच्या दिशेने जाताना बाजूपट्टीची खोदाई केली आहे. अनेक दिवसापासून या खोदाईमुळे ही बाजू पट्टी धोकादायक बनली आहे.
-----------
कोट
आम्हाला या रस्त्यावरून जाताना गतिरोधक, खड्डयांचा धोका आहे. जेष्ठ नागरीक असल्याने कसरत होते. महापालिकेने रस्त्याची डागडुजी करावी.
- पद्मावती खोडके, जेष्ठ महिला
-------------
कोट
रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. गतिरोधकांची उंची जादा असल्याने प्रवास धोक्याचा होतो. या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
- सुरेश कुलकर्णी, नागरीक
-----------
कोट
नगरोत्थानच्या बजेटमधून या रस्त्याचे काम होणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी खड्डे भरून घेऊ.
- एन .एस. पाटील, उपशहर अभियंता, महापालिका, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT