कोल्हापूर

कोल्हापूर .निवडणूक रोखे घोटाळा दडपण्याचा मोदींचा प्रयत्न.. स्टेट बँकेसमोर''इंडिया''आघाडीचे निषेध आंदोलन..

CD

07294
कोल्हापूर : दसरा चौक येथील स्टेट बँकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करताना इंडिया आघाडीचे पदाधिकारी.
...
निवडणूक रोखे घोटाळा
दडपण्याचा सरकारचा प्रयत्न
स्टेट बँकेसमोर''इंडिया आघाडी’चे निषेध आंदोलन

कोल्हापूर, ता. ६ : मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे कायदा संविधान मोडणारा आहे, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार कोणत्या पक्षाला कोणी व किती निधी दिला याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्यायची होती. मात्र, ही माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने आज (ता. ६) येथे ‘इंडिया आघाडी’च्या वतीने दसरा चौक येथील स्टेट बॅंकेच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी आक्रमक आंदोलकांनी आपली भूमिका मांडताना केंद्र सरकारच्या दबावाखाली ही बँक काम करत आहे. ही बँक सर्वसामान्य नागरिकांची असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक रोखेबाबत बँकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच निवडणूक आयोगाने ती संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईटवर १५ मार्चपर्यंत जाहीर करावी, असा न्यायालयाचा आदेश असताना प्रशासन पळवाट शोधत आहे. याबाबत शाखा अधिकारी साबळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तौफिक मुल्लानी, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, शिवसेनेचे संजय पवार, ‘आप’चे संदीप देसाई, कॉ. उदय नारकर, दिलीप पवार, रवी जाधव, अनिल घाटगे, संभाजी जगदाळे, दगडू भास्कर, रमेश कांबळे, मधुकर पाटील, दिलावर मुजावर, एस. बी. पाटील यांच्यासह सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT