कोल्हापूर

पाचगावमध्ये नाले सफाई सुरू

CD

07918
कंदलगाव : पाचगाव ग्रामपंचायतीतर्फे नाले सफाईला सुरुवात झाली.


पाचगावमध्ये
नाले सफाई सुरू
आठवडाभर नऊ ठिकाणी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २ : ग्रामपंचायतीने या वर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच नाले सफाई सुरू केली. आठवड्याभरात ओढा, नाल्यांची स्वच्छता होणार असून नऊ ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे.
पाचगाव परिसराची भौगोलिक स्थिती उताराची आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी नाले अरुंद असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरते. यामध्ये प्रत्येक वर्षी प्रापंचिक साहित्याचे नुकसान होत असल्याने शिक्षक कॉलनी, वटवृक्ष कॉलनी, मगदूम कॉलनी, रेणुकानगर, सहजीवन सोसायटी यांसह परिसरातील सुमारे नऊ ठिकाणच्या ओढा व नाल्यांची सफाईला ग्रामपंचयातीने आजपासून सुरू केली.
-------------------
कोट
मागील अनेक वर्षाचा अनुभव पाहता या वर्षीच्या पावसात तीच स्थिती उद्‌भवू नये. यासाठी ग्रामपंचायतीकडून पावसाळा सुरू होण्याआधीच नाले सफाई सुरू केली. आठवड्याभरात परिसरातील सर्व नालेसफाई पूर्ण होईल.
- प्रियंका पाटील, सरपंच
------------------
कोट
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दोन दिवसांपासून नालेसफाई सुरू केली आहे. संपूर्ण पाचगाव परिसरातील नाले आठवड्यात स्वच्छ होतील.
- संदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel: पनवेलमधील व्हायरल व्हिडिओचे सत्य समोर; अंगणवाडी सेविकेने नव्हे तर आईनेच मुलीला मारहाण केल्याचे स्पष्ट

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Jain Community : मालाडमधील 'त्या' वादग्रस्त प्रकरणावर अखेर पडदा! जैन समाजाचे शिष्टमंडळ 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंना सुपूर्द केला लेखी माफीनामा

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

Pune: रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; सहा फलाटांच्या कामाला सुरुवात ; नवीन ६० गाड्या धावणार

SCROLL FOR NEXT