कोल्हापूर

कंदलगाव .मुख्य रस्त्यावर भटक्या जनावरांचा वावर वाढला.. वाहतूकीस अडथळा.. अपघाताची शक्यता..

CD

08102
भटक्या जनावरांचा वावर
मुख्य रस्त्यावर वाढला

वाहतुकीस अडथळा; अपघाताची शक्यता..

कंदलगाव, ता. २ : उपनगर परिसरात वाढती वाहतूक, पावसाचे दिवस आणि खोदाई केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असताना सध्या याच रस्त्यांवर भटक्या जनावरांचा वावर वाढल्याने प्रवासी व वाहतूकदारांसमोर नवीन समस्या उभी राहिली आहे.
शहरातून बाहेर पडताच जवाहरनगर, सुभाषनगर, हॉकी स्टेडिअम चौक, रामानंदनगर व पाचगाव रस्त्यावरील उपनगर मुख्य रस्त्यावर अनेकदा खोदाई करून रस्ते डागडुजी न करता तसेच ठेवल्याने पावसाचे पाणी साचून त्रास होतो. त्यात भर म्हणजे गेल्या महिन्यापासून भटक्या जनावरांची संख्या वाढली आहे. या रस्त्यावर नोकरदार, व्यावसायिक तसेच विद्यार्थी वाहतूक व नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जादा असल्याने रस्त्यावर गर्दी असते. अशावेळी तासनतास रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या या भटक्या जनावरांमुळे भीती निर्माण होऊन अपघात होतात. संबंधित महापालिका विभागाने जनावरांचा बंदोबस्त करावा; अशी मागणी होत आहे.

कोट
08101
शहरात व उपनगरांतही या भटक्या जनावरांचे कळप फिरत असतात. जवाहरनगर परिसरात जनावरे खूप आहेत. मुख्य रस्त्यावर तासनतास बसून असतात. वाहनधारकांनाच रस्ता बदलावा लागतो.
- अभिजीत व्हटकर, जवाहरनगर

कोट.
08100
सुभाषनगर व जवाहरनगर रस्त्यावरून जाताना जनावरांची भीती वाटते. यामध्ये कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.
- ज्योती देवकर, सुभाषनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

SCROLL FOR NEXT