कोल्हापूर

कंदलगाव .पाचगाव गिरगाव मुख्य रस्त्यावर महावितरणच्या अनागोंदी कारभार.. डीपीची जागा बदलल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात ..

CD

08106
पाचगाव-गिरगाव रस्त्यावर
महावितरणचा अनागोंदी कारभार

डीपीची जागा बदलल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात

कंदलगाव, ता. ३ : पाचगाव - गिरगाव मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला विजेचे खांब व वीजवाहिन्या असताना एका प्लॉटधारकाला होणाऱ्या अडचणीबद्दल वीज वितरणने डीपीच उजव्या बाजूला बसवल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्या डीपीवरून आलेल्या विद्युतवाहिन्या रस्त्यावरून पुन्हा डाव्या बाजूला घेतल्या आहेत. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे.
पाचगावमधून गिरगावला जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला सर्व विजेचे खांब आणि विद्युतवाहिन्या आहेत. या रस्त्याच्या डाव्या बाजूला एका बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. त्याला लागूनच असणाऱ्या रिकाम्या प्लॉटजवळ डीपी उभाण्यासाठी आणला होता. लागणारे लोखंडी पोलदेखील तेथेच पडलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर. के. नगर येथील महावितरणने डीपीच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका रात्रीत उभा केला. या डीपीवरून आलेल्या विद्युतवाहिन्या रस्त्यावरून क्रॉस करून पुन्हा डाव्या बाजूच्या वीज खांबावर घेतल्या आहेत. हा डीपी रस्त्याच्या डाव्या बाजूला असता तर रस्त्यावरून विद्युतवाहक तारा घेण्याची गरज नव्हती. मात्र महावितरणने अनागोंदी कारभार करत वाहनधारकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे.

कोट
डीपी उभा करण्यासारखी पुरेशी जागा असताना तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला यानंतर पुन्हा विद्युतवाहिन्या रस्त्यावरून पुन्हा डाव्या बाजूला घेतल्या आहेत. यामुळे वाहनधारकांच्या जीवास धोका आहे. याची चौकशी करून आर. के. नगरच्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू.
- विराज पाटील, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख

संबंधित कार्यालयाशी संपर्क करून रस्त्यावरील डीपीसंदर्भात माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू.
- दत्तात्रय भणगे, अभियंता, महावितरण, ताराबाई पार्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT